कोलझरला गुरुवारी
नेत्र चिकित्सा शिबिर

कोलझरला गुरुवारी नेत्र चिकित्सा शिबिर

Published on

कोलझरला गुरुवारी
नेत्र चिकित्सा शिबिर
सावंतवाडी ः साई श्रद्धा दिव्यांग निराधार गरजू संघ कोलझर (दोडामार्ग) व नॅब सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. १५) नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. या संदर्भात साई श्रद्धा दिव्यांग संघ गेली कित्येक वर्षे निराधार दिव्यांग व गरजूंसाठी काम करत आहे. यावर्षी संस्थेने नेत्र चिकित्सा शिबिराच्या माध्यमातून लोकांसाठी उपक्रम राबवला असून हे नेत्र चिकित्सा शिबिर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत समाजसेवा हायस्कूल कोलझर येथे होणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या माध्यमातून केले आहे.
......................
मुणगे येथे आज
रेकॉर्ड डान्स स्पर्धा
मुणगे ः येथील नवतरुण उत्साहित प्रासादिक भजन मंडळी देऊळवाडीतर्फे उद्या (ता. १३) त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुणगे-देऊळवाडी येथील नवतरुण प्रासादिक भजन मंडळाच्यावतीने दत्तात्रय पारधी यांच्या निवासस्थानी सकाळी १० वाजता श्रींची महापूजा, ११ वाजता आरती व तीर्थप्रसाद, रात्री ८ वाजता नवतरुण उत्साही प्रासादिक भजन मंडळ मुणगे देऊळवाडीचे बुवा दीपक तुरी यांचे सुस्वर संगीत भजन, १० वाजता जिल्हास्तरीय खुला गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
......................
गोपुरी आश्रमात
वर्धापन सोहळा
कणकवली ः गोपुरी आश्रमाचा ७७ वा वर्धापन दिन नुकताच गोपुरी आश्रमात साजरा करण्यात आला. यानिमित्त कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोपुरीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा ऊर्जितावस्था येण्यासाठी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, प्रिया कामत-राव, शिल्पा कामत-पांगेकर, गोपुरी आश्रमचे उपाध्यक्ष विजय सावंत, विनायक सापळे, मेधा कामत, विनायक मेस्त्री, श्रेयस शिंदे, मयुरेश तिर्लोटकर आदी उपस्थित होते. गोपुरी आश्रम हे केवळ कणकवलीचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे वैभव आहे. एकेकाळी गोपुरी आश्रमात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी होती. गोपुरीत विविध छोटे प्रकल्प सुरू होते. अशा अनेक आठवणींना यावेळी उपस्थितांनी उजाळा दिला. गोपुरीला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुकही करण्यात आले.
......................
कणकवलीतून
डंपर पळविला
कणकवली ः येथील प्रांत कार्यालयासमोरील उड्डाण पुलाखाली लावलेला डंपर चोरट्याने चोरून नेला. याबाबतची खबर सुशील सूर्यकांत दळवी यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. सुशील दळवी यांनी शनिवारी (ता. १०) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास डंपर उड्डाण पुलाखाली लावून ठेवला होता. रविवारी (ता. ११) पहाटे ४ च्या सुमारास तेथे आले असता, त्यांना डंपर दिसला नाही. त्यानंतर दळवी यांनी कणकवली ठाण्यात जाऊन डंपर चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. तपास कणकवली पोलिस करत आहेत.
.....................
‘वंदे भारत’ पावसाळ्यात
कायम ठेवण्याची मागणी
सावंतवाडी, ता. १२ ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता ही गाडी पावसाळ्यात (१५ जून ते २० ऑक्टोबर) या कालावधीत दररोज चालवण्याची मागणी कोकण विकास समितीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कोकण रेल्वेच्या मॉन्सून वेळापत्रकानुसार ही गाडी आठवड्यातून केवळ तीन दिवस धावणार आहे, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला नेहमीच ९५ टक्केपेक्षा जास्त प्रवासी भारमान असते. मुंबई-गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही गाडी पहिली पसंद आहे; मात्र पावसाळ्यातील संभाव्य अडचणींमुळे या गाडीच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेसच्या फेऱ्या देखील चार दिवसांवरून दोन दिवसांवर कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे खेड, कणकवली, थिवीम यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com