देवरूख आगाराच्या बसेस मोडक्या, तुटक्या
देवरूखातील बसची अवस्था दयनीय
फलकाविना प्रवास ; प्रवाशांची डोकेदुखी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता.१३ ः लालपरी आपल्या अंधत्वावर रडत आहे. एसटी बसची अवस्था दयनीय झाली असून, प्रशासनाचे दुर्लक्ष प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख आगारातून ग्रामीण भागातील विविध भागात धावणारी लालपरी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. एसटी बस कुठून आणि कुठे जाणार, याचा अंदाज बांधणे अनेकवेळा प्रवाशांना अतिशय कठीण होत आहे. या बस फलकाविना धावत असल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडते.
देवरूख आगारातून ग्रामीण भागाकडे धावणाऱ्या अनेक एसटी बसवरील मार्गफलक गायब असतात. अशा स्थितीत एसटी बस कोणत्या मार्गावर जाणार, हे प्रवाशांना समजून घेण्यात अडचण येत आहे. एवढेच नव्हे, तर एसटी बस कोणत्या गावात जाणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे व्हाया आहे की थेट आहे, हे कसे समजायचे असे प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसची अवस्था अतिशय दयनीय आणि बिकट झाली आहे. अनेक बसच्या काचांवर चुना लावून गावांची नावे लिहून काम भागवले जात आहे तर अनेक बसमध्ये असे फलक तर लावले आहेत; परंतु रंग फिका पडला आहे आणि अस्पष्ट दिसत आहे तसेच अनेक बसचे फलक तुटलेले आहेत. यावरून परिवहन विभागाचे गांभीर्य दिसून येते.
देवरूख आगाराच्या मोडक्या आणि तुटक्या बसेस म्हणजे ‘म्हातारा नवरा, कुंकवाला आधार’ असे म्हटल्यास काही वावगे ठरू नाही. कारण, राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसवर दररोज हजारो प्रवासी अवलंबून असतात. मग ते शहर असो की गाव. अनेकवेळा नाईलाजाने जीर्ण बसमधून प्रवास करून जीव धोक्यात घालावा लागतो. सद्यःस्थितीत अनेक बसची दूरवस्था झाली आहे.
---
तातडीने समस्या सोडवा...
एसटी प्रशासनाने बसच्यादूरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष घालून त्याची देखभाल दुरुस्ती तातडीने करावी. त्याचबरोबर प्रत्येक बसवर प्रवाशांच्या सहज नजरेत येईल असा फलक लावावा अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.