-मेंदुतील कॅन्सरच्या गाठीवर जागृत अवस्थेत शस्त्रक्रिया

-मेंदुतील कॅन्सरच्या गाठीवर जागृत अवस्थेत शस्त्रक्रिया

Published on

- rat१३p८.jpg-
२५N६३३९४
सावर्डे ः अवघड शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णांसह वालावलकर रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. मृदूल भटजीवाले आणि त्यांचे सहकारी.

मेंदूतील कर्करोगाच्या गाठीवर जागृत अवस्थेत शस्त्रक्रिया
वालावलकर रुग्णालयाचे यश ; कोकणात प्रथमच केला प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १३ : रुग्णाला पूर्णतः भूल न देता शुद्धीत ठेवून मेंदूतील कर्करोगाची गाठ काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सावर्डे येथील वालावलकर रुग्णालयात नुकतीच यशस्वीरित्या करण्यात आली. कोकणात प्रथमच अशा पद्धतीच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
मेंदूतील कर्करोगाची गाठ ही जर बोलण्याची किंवा हातापायांची शक्ती नियंत्रित करणाऱ्या केंद्रांमध्ये पसरलेली असेल तर अशा पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असून, त्यामध्ये निष्णात न्यूरोसर्जन, भूलतज्ज्ञ आणि रुग्णाचे सहकार्य महत्वाचे असते. या दोन्ही शस्त्रक्रिया १५ दिवसांच्या कालावधीत करण्यात आल्या आहेत. दोन्ही रुग्णांच्या मेंदूतील कॅन्सरची गाठ ही मेंदूच्या डाव्या बाजूला असलेल्या बोलण्याची शक्ती नियंत्रित करणाऱ्या केंद्रामध्ये असल्याचे निदान झाल्यानंतर डॉ. मृदूल भटजीवाले यांनी रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. दोन्ही शस्त्रक्रिया रुग्णांना सतत बोलते ठेवून पार पाडण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयाचे प्रमुख न्यूरोसर्जन डॉ. मृदूल भटजीवाले आणि सहकारी तसेच भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर आणि सहकारी यांच्या प्रयत्नांतून यशस्वीरित्या पार पडल्या. सुसज्ज असा शस्त्रक्रिया विभाग (ऑपरेशन थिएटर) आणि निष्णात डॉक्टर यांच्यामुळे अशी अवघड शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात सहजरित्या केली जाते. दोन्ही रुग्ण शस्त्रक्रियेनंतर व्यवस्थित बोलू शकतात आणि समाधानी आहेत. रुग्णांना त्यांचे आयुष्य परत मिळाल्याचा आनंद डॉ. भटजीवाले यांनी व्यक्त केला. या दोन्ही शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना आणि वालावलकर आरोग्य योजना यांच्याअंतर्गत करण्यात आल्या आहेत.
----
कोट
मेंदूतील कॅन्सरची गाठ ही महत्वाच्या केंद्रांमध्ये वाढून त्या भोवतीच्या भागात पसरलेली असू शकते. रुग्णाला सतत बोलते ठेवल्याने शस्त्रक्रियेदरम्यानचे संभाव्य धोके टाळता येतात.
- डॉ. मृदूल भटजीवाले, वालावलकर रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com