वाहनचालकांच्या अतीघाईने होतेय वाहतूक कोंडी
- rat१३p२.jpg, rat१३p३.jpg-
२५N६३३८४
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर परिसरात झालेली वाहतूककोंडी.
- rat१३p४.jpg-
२५N६३३८६
संगमेश्वर : चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने साहित्य रस्त्याच्या शेजारी ठेवण्यात आले आहे.
----
वाहनचालकांच्या अतिघाईने होतेय वाहतूककोंडी
संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील चित्र; डिंगणी, उक्षीचा पर्यायी मार्ग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः उन्हाळी सुटीनिमित्त चाकरमानी आणि पर्यटक संगमेश्वर परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीला त्रासलेले आहेत. चौपदरीकरणामुळे दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. रविवारी रात्रीही याच पद्धतीने तीनवेळा वाहतूककोंडी झाली. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्यामुळे वाहने वेडीवाकडी चालवणाऱ्या बेशिस्त चालकांमुळे वाहतूककोंडीत अधिक भर पडत आहे. त्यामुळे संगमेश्वर बाजारपेठेत दुतर्फा सुमारे ६ ते ७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. यामधून बाहेर पडण्यासाठी कधी कधी दोन ते अडीच तासाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मुंबई-पुण्याहून येणारे पर्यटक चिपळूण, संगमेश्वरमार्गे सिंधुदुर्ग आणि गोव्याकडे जात आहेत. मुंबईहून निघालेले पर्यटक रायगडमधील काही ठिकाणी अडचणींचा सामना करत रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतात. खेड, चिपळूण येथे प्रवास सुखकर झाला की, संगमेश्वर तालुक्यातील सोनवी पुलाजवळ वाहने अडकतात. या पुलापासून पुढे जाताना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. रत्नागिरीतून येणाऱ्या पर्यटकांना बावनदी, वांद्रीपासून पुढे अडथळ्यांची शर्यत पार करत पुढे जावे लागते. संगमेश्वरजवळ आल्यानंतर पर्यटक वाहतूककोंडीत अडकतात. चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम आणि आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतूककोंडी होत असली तरीही प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्याने अरूंद मार्गावर जाण्याच्या दिशेने दोन रांगा तर येण्याच्या दिशेला दोन रांगा लागतात. त्यात अवजड वाहन असेल तर मात्र अडचण होते. काही ठिकाणी दुसरी मार्गिका बंद असल्यामुळे किंवा डायवर्जनचे फलकच न लावल्याने वाहनचालक बंद असलेल्या मार्गिकेत वाहने चालवत जातात. त्यामुळे पुढे जाऊन वाहतूककोंडी होते.
दरम्यान, चिपळूणहून रत्नागिरीकडे छोट्या वाहनातून जाणारे पर्यटक वाहतूककोंडी टाळण्यासाठी डिंगणी मार्गाचा पर्याय निवडत आहेत. तो शास्त्रीपूल येथून सुरू होतो. रत्नागिरीतून चिपळूणकडे येणार छोटे चारचाकी वाहनचालक जे. के. फाईल चौकापासून गणपतीपुळे रोडमार्गे उक्शी आणि डिंगणीमार्गे चिपळूणकडे येत आहेत.
----
पोलिसांचे प्रयत्नही अपुरे
वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात केले आहेत; मात्र पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहने पुढे दामटली जातात. एका बाजूने वाहने जाण्यासाठी पोलिस मार्ग काढत असताना दुसऱ्या बाजूकडील वाहनचालक थांबणे गरजेचे असते; मात्र जोरजोरात हॉर्न वाजवून ते चालक वाहने पुढे घेतात. तिथे पोलिसांचीही मात्रा चालत नाही.
------
स्थानिकांनाही फटका
चिपळूणहून रत्नागिरीला आणि रत्नागिरीहून चिपळूणला दिवसाला शेकडो प्रवासी मिळेल त्या वाहनाने येतात. त्यात काही शासकीय नोकरदारही आहेत. वाहतूककोंडीमुळे त्यांना तब्बल दोन ते अडीच तास उशिरा पोहचावे लागत आहे. एसटीसह खासगी प्रवासी वाहतुकीची वाहने वाहतूककोंडीत अडकल्यानंतर त्यांचे इंधन वाया जाते.
-----
कोट
काम सुरू असलेल्या मार्गिकेत दोन्ही बाजूने घुसल्यानंतर वाहतूककोंडी होते. संगमेश्वर परिसरात होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पोलिस असतात; मात्र प्रवासी त्यांचे ऐकत नाहीत त्यामुळे ज्या मार्गिकेत काम सुरू आहे त्या भागातील रस्ता बंद केल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल.
- संतोष जाधव, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.