१ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी काढले ओळखपत्र

१ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी काढले ओळखपत्र

Published on

शेतकरी ओळखपत्र काढण्यात खेड अव्वल
कृषी विभाग ; १ लाख ७९ हजार ओळखपत्र तयार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकऱ्यांपैकी १ लाख ७९ हजार ५८१ शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र तयार केले आहे. शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) काढण्यासाठी शेतकरी अद्याप उदासीन आहेत. खेड तालुक्यात सर्वाधिक ६० टक्के शेतकऱ्यांनी तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी फक्त २० टक्के शेतकऱ्यांनीच ओळखपत्र घेतले आहे.
कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्याने आपले शेतकरी ओळखपत्र तयार करणे आवश्यक आहे. हे ओळखपत्र असल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी योजना, एकात्मिक फलोत्पादन, फळबाग लागवड योजना, खरीप पिकविमा, फळपिकविमा इत्यादी शासकीय योजना तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेली नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र तयार करावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. हे ओळखपत्र जवळच्या आधारसेवा केंद्रात तयार करून दिले जाते. २४ एप्रिलपासून शेतकऱ्यांची स्वतःच्या मोबाईलवरूनही ओळखपत्र तयार करण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये महसूल विभागाकडून शेतकऱ्यांची गणना करण्यात आली होती. या गणनेनुसार ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी फक्त १ लाख ७९ हजार ५८१ म्हणजेच ३६ टक्के शेतकऱ्यांनीच आपले ओळखपत्र तयार केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र काढून घ्यावे यासाठी आता कृषी विभाग प्रयत्न करत आहे.
---
शेतकरी, त्यांनी काढलेली ओळखपत्रे
तालुका* एकूण शेतकरी* ओळखपत्र काढलेले
लांजा* ३४,३४७* १८,३४४
राजापूर* ६३,७४९* १७,३८९
रत्नागिरी* ८८,७७०* १८,०५५
संगमेश्वर* ५४,३०५* २३,००१
गुहागर* ४७,४६२* २३,४६१
चिपळूण* ७७,९०३* २८,४३२
खेड* ३४,४४९* २०,६९१
मंडणगड* २४,२०१* १०,५२६
दापोली* ६०,७५०* १९,१७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com