ःउत्कर्ष मंडळाने पटकावला मापेलकर स्मृती चषक
- rat१३p१५.jpg -
२५N६३४१४
राजापूर ः विजेत्या उत्कर्ष मंडळ, खरवते संघाला विजेतेपदाचा चषक देवून गौरवताना अॅड. यशवंत कावतकर, संदीप देशपांडे, विलास गुरव आदी मान्यवर.
----
‘उत्कर्ष’ने पटकावला मापेलकर स्मृती चषक
कबड्डी स्पर्धा ; दत्त माऊली संघास उपविजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः तालुक्यातील कोदवली येथील ग्रामविकास सेवा संस्था मांडवकरवाडी संलग्न कला-क्रीडामंचतर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेत दत्त माऊली जुवाठी संघाचा पराभव करत खरवतेच्या उत्कर्ष मंडळ संघाने कै. चंद्रकांत मापेलकर स्मृती चषक पटकावला. दत्त माऊली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अॅड. यशवंत कावतकर, माय राजापूर संस्थेचे सचिव संदीप देशपांडे, कोदवलीचे माजी सरपंच विलास गुरव, कला-क्रीडामंचचे अध्यक्ष महेंद्र हातणकर, खजिनदार विकास मांडवकर, ग्रामविकास सेवासंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, सल्लागार झिमाजी मांडवकर, विठ्ठल मांडवकर, विलास पळसमकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन नायब तहसीलदार दीपाली पंडित, राष्ट्रीय कबड्डी पंच मोहन पाडावे, कोदवलीच्या सरपंच प्रणोती भोसले यांच्या हस्ते झाले. राजापूर तालुक्यातील अनेक नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना दत्त माऊली जुवाठी विरूद्ध उत्कर्ष मंडळ यांच्यामध्ये झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये उत्कर्ष मंडळाने दत्त माऊली जुवाठीचा पराभव केला. या स्पर्धेतील उत्कृष्ट पकडपटू म्हणून दत्त माऊलीचा शेखर पडेलकर, उत्कृष्ट चढाईपटू खरवते संघाचा सागर उबाळे यांची निवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.