खेड -कशेडीमध्ये पहिल्या चार महिन्यांत १० अपघात
कशेडीमध्ये पहिल्या चार महिन्यांत १० अपघात
३ हजार १९० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईपोटी ३७.३६ लाखांचा दंड
खेड, ता. १३ : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी टॅप हद्दीत २०२५ या चालू वर्षांतील पहिल्या चार महिन्यांत १० अपघातांची नोंद केली असून, ४ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे तर ३१९० वाहनांची चौकशी करत दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापोटी महसूल म्हणून सुमारे ३७ लाख ३६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मार्गस्थ होणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसून येत असले तरी गतवर्षापेक्षा मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी पोलिस टॅप हद्दीत अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरीही मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल २५ या कालावधीत चालू वर्षामध्ये महामार्गावर एकूण अपघातांची संख्या १० असल्याची माहिती कशेडी टॅप महामार्ग पोलिसांनी दिली.
महामार्गावर अपघाताचे प्रमाण चिंताजनक असून, बहुतांशी अपघात वेगवान वाहन चालवल्यामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षात शेकडो अपघातात चालकासह प्रवाशांना मृत्यू, गंभीर जखमी याला सामोरे जावे लागले आहे. कमी वेळेत जादा वाहतूक करण्याच्या प्रयत्नात अनेकदा चालक वेगाने वाहने मार्गस्थ करत आहेत. त्यामुळे नियंत्रण सुटते त्याचप्रमाणे २४ तास वाहन चालवल्याने पुरेशी झोप मिळत नसल्याने झोपेअभावी डोळ्यावर येणारी झापड अपघाताची कारणे आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग कोकणसाठी महत्त्वाचा आहे. महामार्गावरील वाहनांची तपासणी व अपघाताप्रसंगी तातडीची यंत्रणा राबवण्यासाठी पळस्पे फाटा ते तळकोकणपर्यंत ७ ठिकाणी महामार्ग पोलिस यंत्रणा उभारण्यात आली आहे. यापैकी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर कशेडी महामार्ग पोलिस यंत्रणा उभी केली असून, या विभागाने आपल्या अधिपत्याखाली असलेल्या मार्गावर केलेल्या वाहनांवरील कारवाईपोटी लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. महामार्ग पोलिसांनी २०१५ मध्ये सर्वाधिक वाहनचालकांवर कारवाई केली होती. गेल्या वर्षभरात पोलिसदलात बदल झाले असून, अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत.
चौकट
मार्ग कायम चर्चेत
दंडाची रक्कम ऑनलाईन प्रणालीसह विविध नियमांचे उल्लंघन केल्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ केल्याने महसूलमध्ये वाढ होत आहे. कशेडी घाटामध्ये अपघाताचे सातत्य कायम राहिल्याने हा मार्ग कायम चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी पोलिसांच्या दिमतीला नवीन वाहन असले तरी क्रेनची कमतरता भासत आहे. अपघात घडल्यास महामार्ग विभागाकडे हक्काची क्रेन नसल्याने बाहेरील क्रेनवर अवलंबून राहावे लागत आहे. महामार्ग पोलिस जनजागृतीसह सुरक्षासप्ताहासारखे कार्यक्रम योग्य पद्धतीने करत असून, गेल्या वर्षापेक्षा यावर्षी नियम तोडणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.