भात बीजोत्पादनात सहभागी व्हा

भात बीजोत्पादनात सहभागी व्हा

Published on

भात बीजोत्पादनात
सहभागी व्हा
खेड : येथील लोकसंचलित साधना केंद्राच्यावतीने गतवर्षीप्रमाणे यंदाही भाताच्या रत्नागिरी-८ जातीचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी व्हावे, आवाहन केले आहे. बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना रत्नागिरी-८ जातीचे बियाणे मोफत दिले जाणार आहे. या बियाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या ९० टक्के भात घरडा फाउंडेशनला दिले जाणार आहे. यासाठी घरडा फाउंडेशन शेतकऱ्यांकडून भात ३० रुपये प्रतिकिलो दराने विकत घेणार आहे. विकलेल्या बियाण्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँकखात्यात एका महिन्यात जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे स्वच्छ असणे गरजेचे आहे. बियाण्यांमुळे भातपिकाचे नुकसान झाल्यास बियाण्यांची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणार आहे; मात्र नैसर्गिक आपत्तीत अथवा वन्यप्राणी यांच्याकडून नुकसान झाल्यास भरपाई घेतली जाणार नाही. त्यासाठी नुकसानीचे पुरावे देणे शेतकऱ्याला बंधनकारक राहणार आहे.
-----
विंधन विहिरींसाठी
जल फाउंडेशनला साकडे
खेड : तालुक्यातील दुर्गम भागातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी कार्य करणाऱ्या जल फाउंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांच्याकडे तालुक्यातील ६ गावातील ग्रामस्थांनी विंधन विहिरीसाठी साकडे घातले. ३ गावांनी साठवण टाक्यांची मागणी केली आहे. जल फाउंडेशन पाणीप्रश्न सोडवण्यासाठी बहिरवलीतील सामाजिक कार्यकर्ते खालीद चौगले व मुंबई महाराष्ट्र विद्यालयाच्या माध्यमातून अग्रस्थानी राहिली आहे. तालुक्यातील घेरारसाळगड-चव्हाणवाडी, रसाळगड-ओझरवाडी, सुकिवली-बौद्धवाडी, आयनी-कोंडवाडी, साखरोली, साखर-सायाचीवाडीतील ग्रामस्थांनी विंधन विहिरीसाठी जल फाउंडेशनकडे अर्ज दिला आहे. मांडवे- कोसमवाडी, दहिवली गावठण व पोलादपूर तालुक्यातील ओंबळी-जाधववाडी येथे साठवण टाकीसह पाईप उपलब्ध करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे जल फाउंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितले.
------
‘पैसाफंड’चा दहावीचा
निकाल ९७.८३ टक्के
संगमेश्वरः संगमेश्वर येथील पैसाफंड इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल ९७.८३ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा यावर्षी देखील कायम राखल्याने संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दहावीमध्ये प्रशालेत प्रांजल गुरव (९६.२०), आदिती मुळये (९०.४०), ओमकार पवार (८७.२० टक्के) गुण मिळवून अनुक्रमे क्रमांक मिळवले.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com