मळगांवातील निवृत्त शिक्षक गणू राऊळ यांचे निधन
63475
मळगांवातील निवृत्त शिक्षक
गणू राऊळ यांचे निधन
सावंतवाडी, ता. १३ ः मळगांव-पिंपळवाडी येथील रहिवासी जेष्ठ कीर्तनकार, निवृत्त शिक्षक गणू यशवंत राऊळ उर्फ नाना मास्तर (वय ९५) यांचे काल (ता.१२) रात्री त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. निरवडे प्रशालेतून ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.
आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा मोठा वावर होता. ते भजन तसेच कीर्तन व प्रवचन करायचे. पिंगुळी येथील श्री संत राऊळ महाराज तसेच सिद्धगिरी मठाचे मठाधिपती महंत श्री काडसिद्धेश्वर महाराज यांचे ते अनुयायी होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. मोडी लिपीचे जाणकार होते. त्यामुळे अनेकजण त्यांचे मार्गदर्शन घेत असते. त्यांच्या निवासस्थानी नेहमीच भजन, कीर्तन नामस्मरण तसेच आध्यात्मिक बैठक होत असे. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करायचे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा वावर असायचा. एकत्र कुटुंबपद्धतीचे ते एक मूर्तीमंत उदाहरण होते. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सर्व कुटुंब शेवटपर्यंत एकत्र ठेवले होते. मृत्यू समयीही त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या सोबत होते.
गेले काही दिवस ते आजारी होते. काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर येथील वझर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन भाऊ, तीन विवाहित बहिणी, चार मुलगे, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. माजी ग्रामविस्तार अधिकारी भरत राऊळ व मधुकर राऊळ यांचे ते भाऊ, यशवंत राऊळ तसेच शिरोडा रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक सुभाष राऊळ, ओएनजीसीचे निवृत्त अभियंता रमेश राऊळ, मळगांव हायस्कूलचे ग्रंथपाल सतिश राऊळ यांचे ते वडिल तर मळगांवच्या माजी पंच सदस्या सुजाता राऊळ यांचे ते सासरे होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.