गावठी गटात पिस्तूल व टिंग्या बैलांची भरारी
-rat१३p२१.jpg-
२५N६३४४६
बैलगाडी स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांचा सन्मान करताना वाघजाई शक्तीपिठाचे पदाधिकारी.
-----
गावठी गटात ‘पिस्तूल’, ‘टिंग्या’ बैलांची भरारी
कोकण केसरी बैलगाडी शर्यत; घाटी गटात गब्बर, महाराज प्रथम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः तालुक्यातील श्री क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई शक्तीपिठाच्या १४व्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय जिल्हा बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या मान्यतेने जिल्हास्तरीय (टेरव) कोकण केसरी बैलगाडी शर्यतीत गावठी गटात कुभांर्लीतील संकेत जाधव यांच्या पिस्तूल व टिंग्या बैलाने तर घाटी गटात मनोहर चाळकेंच्या गब्बर, महाराज या बैलांनी प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हास्तरीय कोकण केसरी बैलगाडी शर्यतीचे ११ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गावठी बैलजोड्या ४०, आडघाटी बैलजोड्या २०, घाटी बैलजोड्या ९० अशा एकूण १५० बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा अत्यंत उत्साहात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी काटेकोर नियोजन सुनील कदम (निम्मेगाव) यांनी केले. स्पर्धेतील विजयी झालेल्या बैलगाडी मालकांचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल असा ः गावठी अ गट - संकेत जाधव (कुंभार्ली, बैलांची नावे पिस्तूल, टिंग्या); विजय मोहिते (पेढांबे, बैलांची नावे शिट्टी, पांड्या); राजू लाड, वैभव तानकर (शिरवली, बैलांची नावे ः देवा, भैरव).
गावठी ब गट ः महेश मांजरेकर, अजय करेलकर (लांजा, बैलांची नावे ः शंभू, बकासूर); बाळूशेठ शिंदे (कळकवणे, बैलांची नावे लाख्या, गोंड्या). घाटी गट ः मनोहर चाळके, समीर कदम, अक्षय बाईत (बैलांची नावे गब्बर, महाराज); निशान साळवी (कापसाळ), मुसासेठ चौघुले (बैलांची नावे पतंग, सरकार); रूपेशसेठ इंगवले (दळवटणे, बैलांची नावे दबंग, कन्नैया); मुसासेठ चौघुले, निशांत साळवी (कापसाळ, बैलांची नावे रूद्रा, रायफल); रामदास चाळके (चिंचघरी, बैलांची नावे पक्षा शंभू).
शक्तीपिठाच्या वर्धापनदिनानिमित्त अभ्यंगस्नान, अभिषेक, नवचंडी याग, नवचंडी हवन, हळदीकुंकू समारंभ, दुपारी महाआरती, महाप्रसाद व संध्याकाळी महाआरती आदी कार्यक्रम झाले. तसेच वालावलकर रुग्णालयाच्या संचालिका सुवर्णा पाटील यांच्या सहयोगाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्यात रुग्णालयातील ५ डॉक्टर व १० नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता तसेच टेरव गावचे सुपुत्र बाबू कदम यांचेही सहकार्य या शिबिराला लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.