आचरा पंचक्रोशीतील शाळांचा दहावीचा १०० टक्के निकाल
swt१३३१.jpg
६३७४१
केतकी घाडीगावकर, शर्वरी परब, कोमल अफराज, सेजल केळुसकर, मंजिरी घाडीगावकर, आकांक्षा तोंडवळकर.
आचरा पंचक्रोशीतील शाळांचा
दहावीचा १०० टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १४ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळातर्फे घेतलेल्या दहावी परीक्षेचा आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
शाळानिहाय निकाल अनुक्रमे असाः धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा - भूमी नाबर (९६.८०), कुंदन नाटेकर (९२.४०), रिया गांवकर (९० टक्के). यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन नीलिमा सावंत, समिती सदस्य बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक अंकुश घुटूकडे यांनी अभिनंदन केले.
नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूल-दिनेश माळगावकर (९२ टक्के), मिताली माळकर (९१.८०), मधुरा मसूरकर (९०.८०). यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष नीलेश सरजोशी, खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार सांबारी, सुरेश गावकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले. श्री ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर वायंगणी-मंजिरी घाडीगावकर (९४ टक्के), सेजल केळूसकर (८८.२०), आकांक्षा तोंडवळकर (८६.८०). जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल-कोमल अपराज (९२.२०), शर्वरी परब (९२ टक्के), केतकी घाडीगावकर (९०.२०). यशस्वी विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर यांनी अभिनंदन केले. आर. ए. यादव हायस्कूल आडवली-ऋतुजा मेस्त्री (८६.८०), भक्ती लाड (८१ टक्के), सानिका घाडीगांवकर (७९.६०). यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.