ःभाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सतीश मोरे

ःभाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सतीश मोरे

Published on

-ratchl१४१.jpg-
२५N६३७००
चिपळूण ः जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांचा सत्कार करताना भाजप पदाधिकारी.
----
भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी मोरे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः जिल्हा नेतृत्वात बदल करताना भाजपने बहुतांशी ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी चिपळुणातील सतीश मोरे यांची निवड केली. त्यांच्या निवडीबद्द शहरातील भाजप कार्यालयामोर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. उत्तर रत्नागिरीतील पाचही तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत पक्षाला आघाडीवर नेणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मोरे यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत पक्ष संघटनेत विविध बदल होत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील ५८ संघटनात्मक जिल्ह्यांच्या नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये भारतीय जनता पार्टी चिपळूणचे माजी तालुकाध्यक्ष, माजी आमदार विनय नातू यांचे विश्वासू सहकारी सतीश मोरे यांची भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी येथील भाजप कार्यालयात फटाक्यांच्या आतषबाजीत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मोरे यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोरे यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी नगरसेवक आशिष खातू, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, माजी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, विनोद भोबस्कर, प्रणाली सावर्डेकर, सारिका भावे, विनायक वरवडेकर, गणेश हळदे, निनाद आवटे आदी उपस्थित होते.
-------
कोट
संपूर्ण देशासह राज्यभरात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उत्तर रत्नागिरीतही पक्ष संघटन मजबूत राहण्यासाठी सांघिकपणे कामकाज केले जाईल. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये भाजप नंबर एकला राहील, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि ग्रामीण भागात कामकाज केले जाणार आहे.
--सतीश मोरे, जिल्हाध्यक्ष, भाजप उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com