बसस्थानकात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे

बसस्थानकात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे

Published on

-rat१४p६.jpg-
२५N६३६५९
साखरपा ः हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत साखरपा बसस्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेले एसटीचे पथक.
-----
साखरपा बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे
अधिकाऱ्यांकडून पाहणी ; परिसरात पे अँड पार्किंगबाबतही विचार
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १४ ः रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील साखरपा हे व्यापारीदृष्ट्या महत्वाचे बसस्थानक असल्यामुळे तिथे कायम प्रवासी असतात. सुरक्षिततेच्यादृष्टीने या बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे एसटी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील साखरपा बसस्थानकाची रायगड विभागाचे विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील यांनी पाहणी केली. साखरपा बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसना येणारी वाहने दिसत नाहीत, ही बाब विभागीय अधीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर बसस्थानकाच्या आवारात लावण्यात येत असलेल्या खासगी वाहनांबाबत लवकर निर्णय घेण्यात येणार असून, त्यासाठी बसस्थानक आवारात पे अँड पार्किंगची व्यवस्था केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. साखरपा बसस्थानक हे व्यापारीदृष्ट्या महत्वाचे असल्यामुळे कायमच प्रवाशांची रेलचेल असते. त्यामुळे बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील, सुहास कांबळे, विभागीय आणि अन्य अधिकारी हजर होते. त्यांच्यासोबत राऊळ मलुष्टे वर्कशॉप अधीक्षक (कार्यशाळा) गणेश वायदंडे, वाहतूक नियंत्रक सलीम साठविलकर, वाहतूक नियंत्रक देवरूख सचिन शेजवळ, वाहतूक नियंत्रक विलास शेळके आणि प्रवासीमित्र उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com