राष्ट्रसेवा दलातर्फे मंदिर मुक्तीदिन
राष्ट्रसेवा दलातर्फे
मंदिर मुक्तीदिन साजरा
चिपळूण : शहरातील पेठमाप येथील संत गाडगेबाबा नगरमधील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये मुक्तीदिन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. १० मे १९४७ रोजी सानेगुरूजींच्या प्राणांतिक उपोषणामुळे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व जातीधर्मियांसाठी खुले करण्यात आले. त्यापूर्वी सहा महिने महाराष्ट्रभर फिरून गुरूजींनी सर्व जातीधर्मियांच्या मंदिर प्रवेशासाठी लोकजागृती केली होती. देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नाही तर देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार मिळायला हवा म्हणजेच सामाजिक स्वातंत्र्य मिळायला हवे, या मागणीसाठी सानेगुरूजींनी केलेला हा सत्याग्रह होता. याचे औचित्य म्हणून राष्ट्रसेवा दलातर्फे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी १० मे हा मंदिर मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. मंदिराचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना राजन इंदुलकर यांनी या प्रसंगाचे औचित्य सांगितले. प्रा. विनायक होमकळस यांनी राष्ट्रसेवा दलाच्या या कृतीचे कौतुक केले.
---
सैनिक कार्यालयातर्फे
लांजात आज मेळावा
पावस : रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे गुरूवारी (ता. १५) लांजा येथील प्रा. मधु दंडवते सभागृहात माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/वीर नारी/वीरमाता/वीरपिता यांचा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात पेन्शनविषयक, अभिलेख कार्यालयविषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडवण्यात येतील. मेळाव्यात येताना आपल्यासोबत डीस्चार्ज पुस्तक, पीपीओची प्रत, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, इसीएचएस कार्ड व आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. मेळाव्याला माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/वीर नारी/वीरमाता/वीरपिता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
--
नागरी संरक्षण दलासाठी
स्वयंसेवक नोंदणी
पावस ः ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणून नोंदणी/भरती करायचे आहे जेणेकरून अनुभवाचा वापर संघटनेला होऊ शकतो आणि त्यामुळे नागरी संरक्षण दलाचे कार्य अधिकच चांगल्या प्रकारे गतिमान होऊ शकते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.