आडिवरे येथे सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन
-rat१४p१८.jpg-
२५N६३७४२
आडिवरे : तावडे अतिथी भवन येथे श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन करताना क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे. सोबत पदाधिकारी.
-rat१४p१९.jpg-
२५N६३७४३
आडिवरे : तावडे भवनात श्री सप्तकोटेश्वराच्या मूर्तीसमोर समईनृत्य सादर करताना पावणादेवी नृत्यसंघाच्या नर्तिका.
------
आडिवरेत सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन
तावडे भवनचा वर्धापनदिन; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनच्या सातव्या वर्धापनदिनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. या रंगारंग कार्यक्रमाला आडिवरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मुंबईकर, तावडे मंडळींनी आवर्जून हजेरी लावली.
तावडे यांचे कुलदैवत श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या भूमीपूजनाचा मान आर्किटेक्ट आणि तावडे अतिथी भवनाचे शिल्पकार संतोष तावडे यांना मिळाला. पहिल्या दिवशी सायंकाळी रत्नागिरीतील स्वराभिषेक प्रस्तूत भक्तीधार हा अभंग, भक्तीगीतांचा कार्यक्रम रंगला. वर्धापनदिनानिमित्त दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेचे यजमान मंडळाचे उपाध्यक्ष सुहास तावडे दाम्पत्य होते. सायंकाळी ५ वाजता क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाची वार्षिक आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यानंतर पावणादेवी नृत्यसंघ (किंजवडे, ता. देवगड) प्रस्तूत समईनृत्याने सर्वांची वाहवा मिळवली. श्री सप्तकोटेश्वराच्या मूर्तीसमोर हे समईनृत्य बहारदार झाले. त्यानंतर आई भगवती कलादिंडी भजन मंडळाने (तोरसोळे, ता. देवगड) दिंडी भजन सादर केले.
दोन्ही दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे व राजेंद्र तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदार प्रदीप तावडे, उपखजिनदार स्नेहा तावडे, विजय तावडे, सुबोध तावडे, आर्किटेक्ट गणपत तावडे, दिलीप तावडे, विश्वनाथ तावडे, सहदेव तावडे, अलका तावडे, अतुल तावडे, श्वेता तावडे, शेखर तावडे, युवाध्यक्ष सुधीर तावडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सभासद, आडिवरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
---
अभिनेत्री तितिक्षाची उपस्थिती
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेली मुंबईतील आघाडीची अभिनेत्री तितिक्षा तावडे ही या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. या प्रसंगी तावडे यांच्या युवापिढीने तावडे हितवर्धक मंडळात सक्रिय व्हावे आणि मंडळ, समाजासाठी योगदान द्यावे, असे तिने आवाहन केले. तिची प्रकट मुलाखत आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.