-माजी विद्यार्थ्यांनी दिले एक लाखाचे साहित्य
- rat१५p१३.jpg-
२५N६३९२५
कडवई ः भाईशा घोसाळकर स्कूलमधील माजी विद्यार्थी.
---
घोसाळकर हायस्कूलला लाखाचे साहित्य भेट
माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार ; ४४ वर्षांनी पुन्हा वर्गात
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पूर्वीचे न्यू इंग्लिश स्कूल दहावी १९८०-८१च्या बॅचचा स्नेहभेटीचा कार्यक्रम तब्बल ४४ वर्षांनी पार पडला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सुंदर असा नामफलक व आर्चरी खेळाचे साहित्य असे सुमारे एक लाख रुपयांचे साहित्य दिले.
कडवईत झालेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आजी-माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत यळगुडकर म्हणाले, स्नेहसंमेलनासाठी सर्व मित्र आले पाहिजेत, असा अट्टाहास करू नका. एकत्र येणे गरजेचे आहे. त्यातून एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. यानंतरचे लाइफ हे बोनस आहे. त्याचा आनंद घ्या.
या कार्यक्रमात पवार, योगिता पेंडसे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांपैकी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक लालासाहेब काळे यांच्या कन्या डॉ. नीता काळे यांनी आठवणींना उजाळा दिला. त्या वेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. मुंबईत उपायुक्त पदावरून निवृत्त झालेल्या संगम पवार यांनी खडतर जीवनप्रवासातून केलेली वाटचाल आपल्या मनोगतातून मांडली. प्रा. शिगवण, प्रा. विजय तुरळकर, कमल चिले, भारती सुर्वे यांनी आपल्या भूमिकेतून शाळेवरचे प्रेम व्यक्त केले. गणेश सुर्वे यांनी शिक्षकांनी विद्यार्थी घडवताना केलेली मेहनत यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात २९ माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्या या भेटीबद्दल मुख्याध्यापक शेषराव अवघडे यांनी शाळेच्यावतीने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.