-जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विलास रहाटे प्रथम
- rat१५p१८.jpg, rat१५p१९.jpg, rat१५p२०.jpg-
२५N६३९३२, P२५N६३९३३, २५N६३९३४
विलास रहाटे यांनी साकारलेली चित्रे.
----
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विलास रहाटे प्रथम
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजन ; साई सनगरे द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विलास रहाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावत २५ हजार रुपये रोख रकमेचे पारितोषिक पटकावले.
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला कलाकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अनेक प्रतिभावंत कलाकारांनी भाग घेतला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी राजेंद्र महाडिक, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, कसबा गावच्या सरपंच पूजा लाणे, मुरलीधर बोरसुतकर, परशुराम पवार, देवरूख कला महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत मराठे आदी उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. या स्पर्धेत रहाटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक साई सनगरे याला देण्यात आला असून, त्याचा २० हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरव केला तर प्रणय फराटे यांना तृतीय क्रमांकासाठीचे १५ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच विजेत्या कलाकारांना रोख पारितोषिकाबरोबरच प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्हदेखील देण्यात आले. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रियांश मिठागरे, प्रज्ज्वल सनगरे, गुरूदेव बारगोडे, रोहित कोकाटे आणि प्रदीप शिवगण यांची निवड करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कसबा येथे होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीमध्ये सध्याची चित्रे लावण्यात यावीत, असे प्रकाश राजेशिर्के यांनी सांगितले. कलाकारांना अशा स्पर्धेतून आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी असते. परिणामी, कलाकारांनी मोठ्या संख्येने अशा स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
-----
कोट
यावर्षी नियोजनासाठी कालावधी कमी पडल्यामुळे चित्रकला स्पर्धेचे स्वरूप जिल्ह्यापुरते मर्यादित ठेवण्यात आले. पुढील वर्षी ही स्पर्धा राज्यस्तरावर भरविण्यात येईल. या द्वारे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक कलाकृती संग्रहित करण्याचा स्मारक समितीचा प्रयत्न असेल.
- राजेंद्र महाडीक, स्पर्धा आयोजक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.