
swt158.jpg
63946
डॉ. यशवंत गोवेकर
वनस्पती रोगशास्त्रज्ञपदी
डॉ. गोवेकर यांना बढती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ः बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. यशवंत गोवेकर यांना सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्रज्ञ प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे बढती मिळाली आहे. डॉ. गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक, (वनस्पती रोगशास्त्रज्ञ), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे बढतीने बदली झाली. बी.एस.स्सी. ॲग्री, बी.एस.स्सी. हॉर्टी तसेच बी.एस.स्सी. फॉरेस्ट्री या पदवी अभ्यासक्रमांमध्ये मागील १२ वर्षे वेगवेगळ्या विषयांचे अध्ययन त्यांनी केले. त्यांनी गेली पाच वर्षे तण संशोधन प्रकल्पामध्ये काम केले. मागील तीन वर्षांपासून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे ''अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन प्रकल्प'' मध्ये कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. आतापर्यंत तीसपेक्षा जास्त संशोधन पेपर विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केले. त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नी सीमा गोवेकर, उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी व त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.