आईच्या संघर्षाला रोहनच्या यशाने चारचॉंद
काही सुखद--लोगो
-rat१५p४.jpg-
२५N६३८८६
रोहन शिगवण
----
आईच्या संघर्षाला रोहन शिगवणच्या यशाने ‘चारचाँद’
धामापूरचा सुपुत्र ; स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये राज्यात १८ वा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे , ता. १५ ः वयाच्या आठव्या वर्षी पित्याचे छत्र हरपलेल्या रोहन शिगवण या तरुणाने महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत महाराष्ट्रात १८वा क्रमांक मिळवला. त्याच्या यशाने आईच्या संघर्षाचे सोने झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर-भडवळेवाडी येथील शिगवण कुटुंबाची कहाणी अत्यंत खडतर आहे. रोहन लहान असतानाच त्याच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले. घरात कोणीही शिकलेले नसल्याने आणि वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. अशा परिस्थितीत मुंबईतील एका दहा बाय दहाच्या चाळीत रोहनची आई संगीता आपल्या दोन लहान मुलांसोबत (सहा वर्षाची बहीण आणि चार वर्षाचा भाऊ) एकाकी पडली होती; परंतु आईने हार मानली नाही. तिने धुणीभांडी करून मुलांना शिकवले. तिच्या कष्टाचे अखेर चीज झाले. रोहन सखाराम शिगवण याने लोकसेवा आयोगाच्या अत्यंत कठीण अशा स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात १८वा क्रमांक पटकावला.
शिगवणने कुटुंबाने अत्यंत गरिबीत आपले जीवन काढले. आपल्या मुलांचे भविष्य आपल्यासारखे अंधारात नसावे, त्यांनी खूप शिकावे या उद्देशाने रोहनच्या वडिलांनी मुंबई गाठली होती. रोहनचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर त्याने विज्ञान शाखेतून अकरावी-बारावी पूर्ण केले आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती मिळाली आणि त्याने अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात त्याने पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली. मुख्य परीक्षेसाठी त्याने रात्रंदिवस अभ्यास केला; मात्र पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले. त्याचे मित्र आणि वर्ग-१ अधिकारी अविनाश भोसले यांचा आदर्श घेऊन त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला. पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाला. पुढे त्याने एमपीएससीची तयारी सुरू केली आणि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे यशस्वीरित्या पार करून राज्यात १८वा क्रमांक मिळवला. आता एक जबाबदार शासकीय अभियंता म्हणून भविष्यात देश आणि समाजासाठी काम करेन, असे रोहनने सांगितले. स्वतःच्या जिद्दीने स्वप्ने विणल्यास नियतीही साथ देते, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
-----
कोट
कोणतेही यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, परिस्थितीचा बाऊ न करता अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सातत्य आवश्यक आहे. त्यामुळे मोठी स्वप्ने पाहा आणि त्यांचा पाठलाग करा.
--रोहन शिगवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.