कुडाळात ''बंधारा पॅटर्न'' यशस्वी
swt१५१९.jpg व swt१५२०.jpg
६३९८७, ६३९८८
कुडाळः येथील पंचायत समितीच्या माध्यमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत बांधण्यात आलेला बंधारा. दुसऱ्या छायाचित्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधून भंगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या ओहोळामधील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. (छायाचित्रे ः अजय सावंत)
कुडाळात ‘बंधारा पॅटर्न’ यशस्वी
पाणी टंचाईवर मातः ६८ गावांत उभारले होते १०७८ बंधारे
अजय सावंतः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ः यंदा तालुक्यात टंचाईवर मात करण्यासाठी बंधारे बांधण्याचा पॅटर्न यशस्वी झाला आहे. तब्बल ६८ गावात बांधलेल्या १०७८ बंधाऱ्यांमुळे पाणी टंचाईची तिव्रता कितीतरी प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. येथील पंचायत समितीने यासाठी पुढाकार घेतला होता. अशा बंधाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील अगदी शेतीलाही मुबलक पाणी मिळाले आहे.
तालुक्यात २०२४-२५ मध्ये ६८ गावामध्ये ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत नदी, ओहोळवर बंधारे मोहीम राबविण्यात आली. तत्कालीन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी पुढाकार घेत सर्व विभाग, ग्रामपंचायत, आजी-माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविली. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील पंचायत समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. त्यामुळे सद्यस्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न सध्या तरी उद्भवला नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी जूनमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास तरी कुडाळ तालुका पाणी टंचाईच्या विळख्यात नाही.
भविष्यात पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी गाळ उपसा मोहीमही हाती घेण्यात आल्याचे दिसून येते. तालुक्यात यावर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक हजार बंधारे बांधणे उद्दिष्ट होते. ते पार करत यावर्षी १०७८ बंधारे नदी, ओहोळवर घालण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतीला सुद्धा मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. शासनाच्या पाणीपुरवठा विषयक ज्या योजना आहेत, त्या सुद्धा राबवण्याच्या दृष्टिकोनातून पंचायत समिती कार्यरत झालेली आहे.
चौकट
गाळ काढणे अंतिम टप्प्यात
शहरातील डॉ. आंबेडकरनगरमधून भंगसाळ नदीपर्यंत ओहोळ जातो. गेले अनेक वर्ष तो मातीने तसेच गाळाने भरला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होत आहे. यामधील गाळ काढणे गरजेचे होते. यासाठी स्थानिक नगरसेवक विलास कुडाळकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला. ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून एप्रिलपासून गाळ काढण्यास सुरुवात झाली असून आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेवक कुडाळकर यांनी अनेक अडचणी आल्या; पण त्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने साथ दिली. नाम फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. यामुळे पूर्णपणे परिस्थिती आटोक्यात येईल असे नाही पण पुराची तीव्रता कमी होणार असल्याचे सांगितले.
कोट
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत कुडाळ तालुक्यात २०२४-२५ या वर्षात १००० बंधारे घालण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, यावर्षी सर्वांच्या सहकार्याने श्रमदानातून १०७८ बंधारे घालण्यात आले. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न यावेळी तरी नाही. ग्रामीण भागात उंच टेकडीवर ज्या धनगर समाजाच्या वस्त्या आहेत, त्या ठिकाणीसुद्धा पाणी टंचाई नाही. जी काही गावे पाणी टंचाईत असतील त्याबाबतचे पत्रक तयार केले आहे, जेणेकरून भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पावले उचलली जातील.
- वासुदेव नाईक, गटविकास अधिकारी, कुडाळ पंचायत समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.