
swt1521.jpg
63998
मळगावः हायस्कूलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीदिनी अभिवादन करताना संजय जोशी. यावेळी उपस्थित मंगेश पाटील, शेखर पाडगावकर, गुरुनाथ गावकर, अभिषेक रेगे, भूषण मांजरेकर, सुनील राऊळ, ज्ञानेश्वर राणे, सहदेव राऊळ आदी.
मळगावात छत्रपती शंभुराजेंना मानवंदना
जन्मोत्सव उत्साहातः शिवकालीन पुरातन वस्तू प्रदर्शनास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ः मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या पटांगणावर धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बुधवारी (ता. १४) उत्साहात व शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली. मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने प्रथमच या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी हर्षिता राऊळ व सिद्धी राऊळ या दोन्ही शालेय मुलींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर सुंदर रांगोळी साकारली. श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मळगाव येथील इतिहासप्रेमी ज्ञानेश्वर राणे यांनी जमा केलेल्या शिवकालीन पुरातन वस्तूंचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले. सायंकाळच्या सत्रात सत्कार सोहळ्याचे व संभाजी महाराज यांच्या जीवनावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष मंगेश पाटील, शेखर पाडगावकर, सुनील राऊळ, गुरुनाथ गावकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे, रेडी यशवंतगड शिवप्रेमी भूषण मांजरेकर, समीर परब, सुधीर राऊळ, संजय जोशी, ज्ञानेश्वर राणे, रितेश राऊळ, सहदेव राऊळ, प्रथमेश राणे आदी उपस्थित होते.
यानिमित्ताने मळगाव इंग्लिश स्कूलच्या दहावी परीक्षेत प्रथम चार क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात प्रथम क्रमांक निधी राऊळ (९६.२०), द्वितीय चैताली राऊळ (९३.२०), तृतीय याज्ञिका साटेलकर (९१ टक्के) व जानवी अमरे (९० टक्के) यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मंगेश पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी संजय जोशी, मंगेश पाटील यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन शेखर पाडगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर मंगेश पाटील यांचे व्याख्यान झाले. मळगाव तसेच परिसरातील शिवशंभूप्रेमींनी श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन घेत शिवकालीन वस्तू प्रदर्शनाचा व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील व्याख्यानाचा लाभ घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.