शाकारलेल्या 21 नौका बंदोबस्तात हलविणार
-rat१५p२५.jpg-
२५N६३९८१
रत्नागिरी ः मिरकरवाडा बंदरातील जेटीला चुकीच्या पद्धतीने शाकारून ठेवलेल्या मच्छीमारी नौका.
----
शाकारलेल्या नौका बंदोबस्तात हलविणार
मिरकरवाडा प्राधिकरण ; सहकार्य न केल्यास सुविधा, नुतनीकरण रद्द
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : मिरकरवाडा बंदरातील जेटींवर चुकीच्या पद्धतीने शाकारून ठेवलेल्या २१ नौका शुक्रवारी (ता. १६) पोलिस बंदोबस्तात मत्स्य व्यवसाय विभागाकडून हलविण्यात येणार आहेत. मासेमारी करून येणाऱ्या नौकांना अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने उभ्या करण्यासाठी नौका मालकांकडून सहकार्य न मिळाल्यास त्या मालकांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्या नौकांच्या मासेमारी परवान्याचे नुतनीकरण रोखले जाणार आहे. शासनाकडून मिळणाऱ्या डिझेल परताव्यासारखे लाभ मिळून द्यायचे नाहीत, अशा प्रकारचे नियोजन मिरकरवाडा प्राधिकरणाने केले आहे.
मिरकरवाडा बंदरामध्ये आता हा नवा वाद पुढे आला आहे. त्यामुळे होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पावसाळी मासेमारी बंदी ३१ मेपासून सुरू होते. या बंदीपूर्वीच १० मेपासून काही नौकामालकांनी आपापल्या मच्छीमार नौका मिरकरवाडा बंदरातील विविध जेटींवर शाकारून ठेवल्या आहेत. पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी त्या नौकांवर प्लास्टिक कापड आच्छादून बांधून ठेवण्यात आले आहे. अशा पद्धतीने शाकारून ठेवलेल्या या नौकांमुळे समुद्रात मासेमारी करून परतलेल्या नौकांसाठी हा अडथळा निर्माण झाला आहे. मासेमारी करून आलेल्या नौकांमधील मासळी जेटीवर उतरताना गैरसोयीचे होत आहे. या संदर्भात मिरकरवाडा प्राधिकरणाकडे तक्रारी झाल्यानंतर शाकारून ठेवलेल्या नौकामालकांना नोटीस देऊन नौका काढून घेण्यास कळवण्यात आले.
नौकामालक इम्रान मुकादम, शादाब वाडकर, सिराज वाडकर, यासीन साखरकर, रफीक वस्ता, मतीन मजगांवकर, साहील मुकादम, नजीम मुल्ला, अब्दुल मुकादम, हनिफ मुकादम, फराह बानू मुकादम, शीतल सावंत, रिझवाना वस्ता, यांना नोटीस देऊन नौका काढून घेण्यास सांगण्यात आले आहे; परंतु नौकामालकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने मिरकरवाडा प्राधिकरणाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली.
मंत्र्यांचा दौऱ्यामुळे बंदोबस्तात अडचण
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने जिल्ह्यातील पोलिस कुमक मंडणगड, दापोलीत गेली होती. त्यामुळे तातडीने पोलिस बंदोबस्त मिळाला नाही. दौरा संपल्यानंतर शुक्रवारी पोलिसांचा बंदोबस्त दिला जाणार असून त्यामाध्यमातून नौका हलवण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.