दिव्यांग बांधवांचा हिर्लोकमध्ये मेळावा
swt163.jpg
64165
हिर्लोकः दिव्यांग बांधवास तीनचाकी दुचाकी अर्पण करताना सरपंच प्राची सावंत.
दिव्यांग बांधवांचा
हिर्लोकमध्ये मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः महात्मा गांधी सेवा संघ संचलीत दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने तालुक्यातील हिर्लोक पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये हिर्लोक गावचे सरपंच प्राची सावंत, बचतगट महिला सीआरपी व ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे, कर्मचारी प्रणाली दळवी, संजना गावडे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्यावतीने स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अनिल शिंगाडे आणि सरपंच प्राची सावंत यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले. कर्मचारी दळवी यांनी दिव्यांग बांधवांना गाडीसाठी फॉर्म दिले व त्यासंबंधी सर्व माहिती सांगितली. चार दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेण्यात आली.
या मेळाव्यामध्ये निलेश नाईक यांना व्हीलचेअर देण्यात आली असून अक्षय तावडे यांना पंचायत समितीच्या माध्यमातून तीनचाकी गाडी मिळवून देण्यात आली. पुनर्वसन केंद्र व हिर्लोक सरपंच प्राची सावंत यांनी अक्षयचे अभिनंदन केले व गाडीला हार व श्रीफळ अर्पण करून गाडीचे उद्घाटन केले. मेळाव्याला ४० हून जास्त दिव्यांग बांधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.