चिपळूण ःकोयनेचे पाणी मुंबईत नेण्यासाठी भूगर्भ चाचणी
ratchl162.jpg-
64188
चिपळूणः कळंबस्ते नदीकिनारी करण्यात आलेली भूगर्भ चाचणी.
------------
कोयनेचे पाणी मुंबईत नेण्यासाठी भूगर्भ चाचणी
कळंबस्तेत दिल्लीतील संस्थेकडून परीक्षण; ६७ टीएमसी पाणी नेण्याचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर शहरातील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे ६७ टीएमसी अवजल मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. पाणी वापराकरिता पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरिता कळंबस्ते येथे वाशिष्ठी नदी किनारी दिल्ली येथील संस्थेकडून मृदा परीक्षणाबरोबर भूगर्भ चाचणी घेण्यात आली.
गेल्या अनेक वर्षानंतर कोयना अवजलाचा पुनर्वापर करण्यावर सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. कोयना धरणातील जलविद्युत निर्मितीनंतर कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीमार्गे समुद्राला वाया जाणारे पाणी हे भविष्यात सिंचन, बिगर सिंचन वापराकरिता वळवणे प्रस्तावित आहे. वाशिष्ठी नदीतून हे पाणी सुमारे १६० किमी अंतरावर असलेल्या मुंबईला जलवाहिन्यांद्वारे नेण्यावर नियोजन करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी ३८ कोटी खर्चाचे काम हवाई सर्व्हेक्षण व्हॅसकॉम कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. तर आता विविध परीक्षणासाठी, कोयना अवजलाच्या भविष्यामधील पाणी वापरासाठी प्रकल्प व्यवहार्यता अहवाल तयार करण्याकरता केंद्र शासन अंगीकृत नवी दिल्ली येथील वाप्कोस लिमिटेड व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यामध्ये ‘एमओयू'' करार करण्यात आलेला आहे. त्यानुसार सदर कंपनीकडून गेल्या महिनाभरापासून नदी किनारी कळंबस्ते येथील स्मशानभूमी ठिकाणी विविध सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. यासंदर्भात कोलाड पाटबंधारे विभाग कार्यालयाने कळंबस्ते ग्रामपंचायतीला पत्र पाठवत याबाबती माहिती दिल्याचे सरपंच विकास गमरे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीमधील स्मशानभूमी जवळील जागेत मृदा संरक्षण करण्याबरोबरच हवाई सर्वेक्षण, भूगर्भ चाचणी, मृदा नमुना घेऊन मृदा परीक्षण करणे आदी परीक्षणाची कामे अहवाल तयार करण्यासाठी करण्यात येणार असल्याने वाप्कोस कंपनी व त्याच्या संबंधित अभियंत्यांना सहकार्य करण्याची विनंती या पत्राद्वारे पाटबंधारे विभागाने केली आहे.
चौकट
रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जलवाहिनी
दिल्लीतील कंपनीच्या येथे आलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नदीवर बंधारा प्रस्तावित आहे. येथील मोठी जॅकवेल बांधून तेथून पाणी उचलले जाणार असल्याचे प्राथमिक नियोजन आहे. त्यादृष्टीने या परिसरात विविध चाचण्या घेतल्या गेल्या. कोकण रेल्वे मार्गाच्या ट्रॅकच्या बाजूने जलवाहिनी नेण्याचा विचार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
चौकट
स्थानिकांच्या विरोधामुळे कर्मचारी निघून गेले
दरम्यान, यासंदर्भात बोलताना कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी सांगितले की, स्थानिकांचे प्रश्न सुटल्याशिवाय येथे बांधण्यात येणारी मोठी जॅकवेल व बंधाऱ्याचे काम आम्ही होऊ देणार नाही. सर्वेक्षण सुरू केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. यामुळे काम अर्धवट सोडून कंपनीचे कर्मचारी निघून गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.