देशासाठी जिल्ह्यातील 35 जवानांना वीरमरण

देशासाठी जिल्ह्यातील 35 जवानांना वीरमरण

Published on

देशाच्या रक्षणात जिल्ह्यातील ३५ जवानांना वीरमरण
ऑपरेशन सिंदूरमुळे स्मरण ; ३ हजार ७८३ माजी सैनिकांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धाची ठिणगी पडली आणि जिल्ह्यातील सैनिकांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि योगदानाच्या स्मृती जाग्या झाल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजवर देशासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या जिल्ह्यातील ३५ जवानांना वीरमरण आले. एकूण ३ हजार ७८३ माजी सैनिकांची नोंद असून ३ हजार ९२९ विधवा आहेत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ही आकडेवारी मिळाली.
स्वातंत्र्यलढ्यात जसे रत्नागिरी जिल्ह्याचे योगदान आहे तसे स्वात्रंत्र्यप्राप्तीनंतर हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील हजारो तरुण सैन्यात भरती झाले आहेत. वेळप्रसंगी बलिदानही दिले आहे तर काही जखमी झाले. आजही हजारो तरुण सैन्य दलात कार्यरत आहेत. देशसेवा करताना ३५ जवान ठिकठिकाणी शहीद झाले. त्यात ३ वीरपुत्रांचा समावेश आहे. शिरगाव (ता. चिपळूण) येथील संतोष शिंदे १९९८ मध्ये काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांशी लढताना शहीद झाले. १९७१ च्या युद्धात मोरवणे येथील रामचंद्र गणपत शिंदे शहीद झाले होते. २००८ मध्ये दापोली येथील जवान तुकाराम बोईटे आणि धामणंदचे उत्तेकर देशसेवा करताना शहीद झाले. मंडणगड तालुक्यातील राजेंद्र यशवंत गुजर हे भारतीय १९७१ च्या युद्धात मोरवणे येथील रामचंद्र गणपत शिंदे शहीद झाले होते. २००८ मध्ये दापोली येथील जवान तुकाराम बोईटे आणि धामणंदचे उत्तेकर देशसेवा करताना शहीद झाले. मंडणगड तालुक्यातील राजेंद्र यशवंत गुजर हे भारतीय वायूदलात पायलट फ्लाईंग लेफ्टनंट पदावर कार्यरत होते. आसाममधील मापूम पारे जिल्ह्यात देशसेवा करत असताना ४ जुलै २०१७ ला ते शहीद झाले. पाचल (ता. राजापूर) येथील कॅप्टन प्रेमकुमार पाटील ऑगस्ट २०१५ मध्ये काश्मीरच्या सीमेवर शहीद झाले.
देशासाठी बलिदान दिलेल्या जिल्ह्यातील अशा ३५ जवानांना वीरमरण आल्याची नोंद सैनिक कल्याण कार्यालयात आहे. यामध्ये ३ वीर माता-पितांचा समावेश आहे. तसेच ३ हजार ७८३ जिल्ह्यातील माजी सैनिक आहेत. यामध्ये सर्वांत जास्त खेड तालुक्यातील १ हजार ४३९ तर त्या खालोखाल चिपळूण तालुक्यातील १ हजार २६९ सैनिकांचा समावेश आहे.
----
घरटी एक माणूस सैन्यामध्ये
खेड तालुक्यातील तिसंगी, मोरवणे, धामणंद, शिवथर ही गावे सैनिकांची गावे म्हणून ओळखली जातात. या गावातील घरटी एक माणूस सैन्यामध्ये आहे. दुसऱ्या महायुद्धात शिवथर गावातील शंभरहून अधिक जवान शहीद झाले होते. त्यांचे स्मारकही बांधण्यात आले आहे.
--
माजी सैनिकांची तालुकानिहाय माहिती
चिपळूण* १,२६९
दापोली* २२६
गुहागर* ७५
खेड* १,४३९
लांजा* ७०
मंडणगड* १२३
राजापूर* ५६
रत्नागिरी* १९१
संगमेश्वर* ३३४
-------------------------
एकूण* ३,७८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com