

64418
रायगडावर ९ जूनला ‘शिवराज्याभिषेक’
सुनील पवार ः आढावा बैठकीत सोहळ्याचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः किल्ले रायगड येथे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीदिनी ९ जूनला साजरा होणाऱ्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीसाठी राज्य शासन, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती व मावळे सज्ज झाले आहेत. विविध कार्यक्रमांनी हा सोहळा दिमाखदार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती किल्ले रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. नियोजनाची आढावा बैठक रायगड येथे झाली.
रायगड येथे ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर याची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजनामंत्री भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हाधिकारी श्री. जावळे, रायगड पोलिस अधीक्षक श्री. घार्गे, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.
श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारी संदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. तसेच शासनातर्फे सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या शिवभक्तांना देण्यात येणाऱ्या सुविधांसंदर्भात चर्चा झाली. याप्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष सनी ताठेले, सचिव समीर वारेकर, जनसंपर्कप्रमुख रंजन गावडे, सदस्य संजय ढमाळ व नीलेश सकट उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘‘राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत. गेली ३२ वर्षे समिती अध्यक्ष या माध्यमातून सर्व मावळे व समितीचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा राज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. ९ जूनला साजरा होणारा ३५२ राज्याभिषेक सोहळा आहे. हा सोहळा साजरा करण्यासाठी राज्यातील लाखो मावळे सज्ज झाले आहेत. गडावर येण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.