अभिनयाची आवड ठरली बळ देणारी

अभिनयाची आवड ठरली बळ देणारी

Published on

64453

अभिनयाची आवड ठरली बळ देणारी

भाऊ कदम ः ‘सीरियल किलर’ नाटकाच्या निमित्ताने दौरा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः अभिनयाची आवड मला रंगभूमीवरील प्रवासाला बळ देणारी ठरली. घऱच्यांचा नोकरी करावी, असा आग्रह असूनही मी त्यात रमलो नाही. या क्षेत्रात एकेक पायरी टाकत आतापर्यंतच्या अभिनय क्षेत्रातील मुक्कामापर्यंत पोहोचलो, असे प्रसिध्द अभिनेते भाऊ कदम यांनी येथे झालेल्या गप्पाटप्पा कार्यक्रमात सांगितले.
सिनेसृष्टीतील सिने नाट्य अभिनेते भाऊ कदम आज जिल्हा दौऱ्यावर आले. येथील हॉटेल कोकण स्पाइस येथे त्यांच्याशी ‘सीरियल किलर’ नाटकासह त्यांच्या अभिनय क्षेत्रातील एकूण प्रवासाच्या अनुषंगाने गप्पाटप्पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सीरीयल किलरचे निर्माते प्रणय तेली, लेखक केदार देसाई, नाट्यकलाकार तेजस पिंगुळकर आदी उपस्थित होते.
भाऊ कदम म्हणाले, ‘‘अल्पावधीतच नाट्य रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारे ‘सीरियल किलर’ नाटक लवकरच परदेश दौऱ्यावर जाईल. लवकरच हे नाटक सुवर्ण महोत्सव आणि ५०० व्या नाट्यप्रयोगाकडे वाटचाल करेल. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नाटकाचा ३९ वा प्रयोग आज पणजी कला अकादमी येथे व ४० वा प्रयोग उद्या (ता. १८) कणकवली येथे होत आहे. सर्व कलाकार कोकणातील असून त्यांनी जो शिवधनुष्य पेलला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. या नाटकाला डिमांड शो मागणी असल्यामुळे सिंधुदुर्गसह अन्य भागांमध्येसुद्धा हे नाटक पुन्हा होणार आहे.’’ ते म्हणाले, ‘‘महाविद्यालयात असताना मी नाट्य क्षेत्राकडे वळलो. या गोष्टीला घरच्यांचा विरोध होता. घरच्यांनी नोकरीकडे वळवण्याकडे सातत्याने प्रयत्न केला; पण मी नोकरीत रमलो नाही. ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून मी टीव्ही, प्रसारमाध्यमांमध्ये आलो. निर्माते सतीश तारे, डॉ. नीलेश साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले.
...................
‘सीरियल किलर’ची सिंधुदुर्गशी नाळ
कुडाळेश्वराच्या कृपाप्रसादाने व रंगदेवतेच्या आशिर्वादाने ‘सीरियल किलर’ हे नाटक १२ ऑक्टोबरला रंगमंचावर दाखल झाले. नाटकाचे निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक तसेच संगीतकार विजय गवंडे, प्रकाश योजनाकार श्याम चव्हाण, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये व ‘सीरियल किलर’ हे नाव सुचविलेले गीतकार गुरू ठाकूर, सहाय्यक अभिनेता तेजस पिंगुळकर आणि अभिनेते भाऊ कदम हे सर्व मालवणी असल्याने या नाटकाची नाळ सिंधुदुर्गाशी घट्टपणे जोडली आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील हा माझा पहिलाच प्रयोग आहे. वेगळ्या धाटणीचे, मनोरंजनात्मक प्रबोधन करणारे हे नाटक आहे, असे निर्माता प्रणय तेली, लेखक केदार देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com