
99187
समस्या निवारणासाठी
विनायक राऊत आज
‘बीएसएनएल’ला भेटणार
सावंतवाडी ः माजी खासदार, ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत हे सोमवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता येथील बीएसएनएल कार्यालयाला भेट देणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार असताना त्यांनी अनेक मोबाईल टॉवर मंजूर केले तसेच बीएसएनएलच्या सुविधाही सुधारल्या होत्या; मात्र आता अनेक गावांतील मंजूर टॉवरचे काम रखडले आहे. बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक टॉवर नादुरुस्त अवस्थेत बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी बीएसएनएल कार्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावांमध्ये बीएसएनएलबाबत तक्रारी आहेत, त्या गावातील नागरिकांनी सोमवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन ठाकरे शिवसेना सावंतवाडी मतदारसंघाचे विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.