ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरातील हनुमान मंदिर कलशारोहण

ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरातील हनुमान मंदिर कलशारोहण

Published on

ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरातील
हनुमान मंदिराचे कलशारोहण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई- तृणबिंदूकेश्वर ट्रस्टच्या ग्रामदैवत श्री भैरी मंदिराच्या आवारातील श्री देव हनुमान मंदिराचा कलशारोहण समारंभ २१ ते २३ मे दरम्यान आयोजित केला आहे.
श्रीमती सत्यभामा कृष्णकांत बोरकर यांनी त्यांचा मुलगा (कै.) लिलाधर यांचे स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाला आहे. करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. २१) सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंदिर ते भैरी मंदिरपर्यंत कलश मिरवणूक सोहळा होईल.
२२ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्याहवाचन, देवता स्थापन, वास्तुसंप्रोक्षण, देव संप्रोक्षण, कलश स्नानविधी होतील २३ मे रोजी सकाळी ८ ते ११.३० पर्यंत देवता पूजन, हवन, सत्यमारुती पूजा, पूर्णाहुती, सकाळी ९ वाजता कलशारोहण व सत्कार समारंभ होईल. दुपारी १ ते २.३० या वेळेत श्री कालभैरव प्रासादिक भजन मंडळ (मुरुगवाडा, बुवा दीपक पिलणकर) यांचे भजन, दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ (केळ्ये, बुवा उदय मेस्त्री, दीनानाथ बारगुडे) यांचे भजन होईल. सायंकाळी ५ ते ६ वेळेत श्री अनिरुद्ध बापू शहर उपासना केंद्रातर्फे हनुमान चालिसा पठण, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ (कोतवडे, बुवा विजय मयेकर) आणि ८ ते १० या वेळेत श्री राम प्रासादिक भजन मंडळ (शिरसे, राजापूर, बुवा संतोष शिरसेकर) यांचे भजन होईल.
या सोहळ्याला बारा वाड्यांतील सर्व गावकरी, मानकरी, उत्सव समिती सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com