फळांच्या राजाचा मालक कर्जबाजारी
बिग स्टोरी
६४५९३
६४५९४
६४५९५
६४५९६
६४५८५
इंट्रो
कोकणच्या अर्थकारणात हापूसला प्रचंड महत्व आहे. मात्र फयान वादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील हापूसचे उत्पादन अस्थिर होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतुचक्रात होत असलेले बदल, किडरोगांचा प्रादुर्भावामुळे त्यावर नियंत्रणासाठी होत असलेला औषधोपचारांवरील वाढलेला खर्च, दलालांमुळे दरातील अस्थिरता यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबा बागायतदार निर्सगापुढे हतबल झालेले पाहायला मिळत आहेत. यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी जालीम उपाययोजना करणे आवश्यक आहे. परिणामी बागायतदारांपुढील आव्हानात दिवसेंदिवस भर पडत आहे. करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या आंबा व्यवसायाच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूसचे ३० टक्केच उत्पादन हाती आल्यामुळे यंदा शेतकरीही हवालदिल झाला आहे. हंगाम संपता संपता बागायतदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह स्थानिक पालकमंत्री उदय सामंत यांना साकडं घातलं आहे. ते तरी याकडे गांभीर्याने पाहतील आणि प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करतील अशी आशा बागायतदार बाळगून आहेत...!
- राजेश कळंबटे, रत्नागिरी
------
फळांच्या राजाचा मालक कर्जबाजारी
उत्पादनातील घटीमुळे हापूस घाट्यात ; हंगामाची सांगता चिंतेत
नैसर्गिक रचना आणि हवामान व्यवस्थित असेल तरच हापूसचे उत्पादन चांगले मिळते. त्यामध्ये थोडा जरी बिघाड झाला तरी उत्पादनाचे प्रमाण आणि फळाचा दर्जावर परिणाम होते. गेल्या दहा-बारा वर्षांत या परिस्थितीचा वारंवार अनुभव येत आहे. कधी लांबणारा पावसाळा, तर कधी कमी काळ टिकणारी थंडी, भाजून काढणारा उन्हाचा कडाका या तिन्ही ऋतुंमधील बदल अडचणीचे ठरत आहेत. बदललेल्या हवामानाचा उत्पादनावर विपरित परिणाम झालेला आहे. एरवी आंब्याच्या झाडाला चांगला मोहोर येण्यासाठी १४-१५ अंश किमान तापमान असलेली थंडी पडावी लागते आणि फळधारणा झाल्यानंतर आंबा चांगल्या प्रकारे पिकण्यासाठी सुमारे ३०-३५ अंशांपर्यंत तापमान लागते. यात थोडा बदल झाली की फळगळ, साल भाजून निघणे असा फटका बसतो. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात हंगामाने साथ दिली, मात्र यंदा चित्र वेगळेच होते.
----------
* यंदा ३० टक्केच उत्पादन
मोसमी पाऊस लांबल्यामुळे यंदा अपेक्षेप्रमाणेच हंगामाची सुरवात विलंबानेच झाली. कलमांच्या मुळाशी पाणी राहिल्यामुळे मोहोर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस येऊ लागला. आलेला मोहोर जून होऊन त्यात फळाची सेटींग होण्यासाठी जानेवारी महिना उजाडला. पहिल्या टप्प्यात अवघा ५ टक्केच मोहोर आलेला होता. त्यामधून उत्पादन आले तेही अत्यल्पच. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील उत्पादन मार्च महिनाअखेरिस हाती आले. गतवर्षी पहिली पेटी जानेवारी महिन्यातच रवाना झाली होती. मात्र यंदा फेब्रुवारीत पहिली पेटी वाशीत गेली. त्याला २२ हजार रुपये दर मिळाला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात दिवसाला दोन-चार पेट्या वाशी बाजारात पाठविल्या जाऊ लागल्या. मार्चत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सरासरी ४ हजार पेट्यांची आवक बाजारात होती. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातून अवघ्या हजार ते बाराशे इतक्याच पेट्या होत्या. एप्रिलमध्ये हापूसच्या पेट्यांची संख्या वाढली आणि ती दिवसाला ५० ते ७५ हजारापर्यंत पोचली. परंतु मेच्या पहिल्या आठवड्यात उत्पादनात मोठी घट राहीली. तिसऱ्या टप्प्यात अपेक्षित मोहोर न मिळाल्याने आणि उन्हाच्या कडाक्यामुळे आंबा तयार होण्याचा कालावधी कमी राहिला. ५० ते ७० दिवसाचाच आंबा हंगाम राहिला. त्यातील ४० दिवसात मोठ्याप्रमाणात आंबा मिळत होता. त्यामुळे मेमध्ये कमी पीक राहिले. यंदा ३० टक्केच उत्पादन हाती आल्याचे चित्र दिसत आहे. १० मे नंतर अनेक बागायतदारांनी जमा-खर्चाचा ताळमेळ साधण्यास सुरवात केली. काहींनी रखवालदारांनाही माघारी पाठविले.
----------
* दरातील चढ-उतार
हापूसच्या पहिल्या पेटीला पाच डझनला २२ हजार रुपये दर मिळाला होता. त्यानंतर पेटीचा दर सरासरी १० हजार रुपयांपर्यंत राहिला. पुढे मार्च महिन्यात उत्पादन कमी असल्यामुळे दर ६ ते ७ हजार रुपये बाजारात आकारला जात होता. परंतु, हा दर आठवडाभरच होता. त्यानंतर पुढे एक हजाराने त्यात घट झाली. एक नंबरच्या आंबा पेटीचा ५ हजार रुपये हा दर सुमारे १० ते १५ दिवसच राहिला होता. पाडव्याला म्हणजेच मार्चच्या अखेरीस आवक वाढल्यामुळे दर खाली आले. त्यानंतर १५०० रुपयांपासून ४ हजार रुपयांपर्यंत दर होते. पण एप्रिल महिन्यात आवक दिवसेंदिवस वाढत राहिल्याने हे दर कमी होत गेले. मे महिन्याच्या अखेरीस ८०० ते २००० रुपयांपर्यंत पेटीचा दर आहे. गतवर्षी आंबा हंगाम १२० दिवस होता. तो यंदा कमी झाला. त्यामुळे यंदा दरातील बदल सातत्याने कमीच राहिल्याने त्याचा परिणाम बागायतदारांच्या नफ्यावर होणार आहे. २० एप्रिलपर्यंत बाजारात दर टिकून राहिला नाही.
---------
* तोट्याचा व्यावसाय
खर्च तेवढाच आणि माल कमी अशी स्थिती असतानाच दर अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे चित्र यंदाच्या हंगामात दिसते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा मे अखेरीस ७०० ते ८०० रुपयांची घट पेटीमागे झाली आहे. त्यामुळे किटकनाशकाचा खर्च, बँकांकडून घेतलेले कर्जे फेडताना बागायतदारांना कसरत करावी लागणार आहे. मोठा बागायतदार व्याज भरून ते कर्ज तसेच ठेवेल आणि पुढील हंगाम चांगला येण्यासाठी आशा बाळगून राहील अशी प्रतिक्रिया बागायतदार व्यक्त करीत आहे.
--------
* कॅनिंगलाही फटका
२०२३ साली हापूसची जी परिस्थिती होती, त्याप्रमाणेच यंदा कॅनिंग व्यवसायाची स्थिती आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा मॅंगोपल्पचे दर २५ टक्क्यांनी वाढणार आहेत. २०२४ ला ३.१ किलोचा डबा ५०० रुपये होता, तो यंदा ६०० रुपये किलोवर जाईल. ८५० ग्रॅमचा डबा १६५ रुपयांवरून २२५ रुपयांपर्यंत जाईल. यावर्षी ७ एप्रिलपासूनच कॅनिंगसाठीच्या आंब्याची खरेदी सुरू झाली होती. उत्पादन कमी असल्याने स्थानिक व्यावसायिकांनीचे हापुसची मोठ्याप्रमाणात खरेदी केली. एप्रिलमध्ये बाजारातील हापूसचे दर कमी झाल्यामुळे अनेक बागायतदारांनीही बारीक व डागी फळ किलोवर दिले. तेव्हा ६० ते ६५ रुपये दर होता. आता तोच दर ४५ ते ५० रुपये किलो आहे. शेवटच्या टप्प्यात कमी उत्पादन असल्याने फायदा झालेला नाही. मेच्या सुरुवातीला किलोचा दर ४० रुपयांपर्यंत होता, तेव्हा काही छोट्या कॅनिंग व्यावसायिकांनी हापूसची खरेदी केली. परंतु यंदा परराज्यातील आंबा मिक्स करून रत्नागिरी हापूसच्या नावाने प्रक्रिया पदार्थांची विक्री अधिक होण्याची भितीही आहे.
--------
(टीप- खालील दोन मद्दे स्वतंत्रपणे चौकटीत घ्यावेत. दोन्ही चौकटीसाठी फोटो घ्यावेत)
rat१८p१७.jpg-
64636
रक्षकसापळा
-rat१८p२०.jpg-
64641
तापमानातील बदलामुळे खराब झालेला आंबा.
कळीचे मुद्दे
- अवकाळी पावसाचा तडाखा
एप्रिलमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हापूसला बसला. पाऊस पडून गेल्यानंतर तापमानही ३६ अंशावर गेले होते. त्यामुळे आंबा वेगाने तयार झाला आणि बागायतदारांनी काढणी सुरू केली. वातावरणातील हे बदल फळमाशी प्रादुर्भावाला पोषक ठरले. त्यामुळे हापुसच्या दर्जाबाबत तक्रारी मोठ्याप्रमाणात आल्या होत्या. त्याचा दरावरही परिणाम झाला. तसेच कातळावरील बागांमध्ये १८० ते २०० ग्रॅमच्या फळातही साका पहायला मिळाला. काही बदल यंदा प्रथमच नोंदले गेले आहेत. गेले १५ वर्षे फळमाशीचा मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे. परंतु त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासनही अपुरे पडत आहे. फळमाशीला रोखण्यासाठी आवश्यक रक्षकसापळे, चिकट सापळे यांचा पुरवठा वेळेत बागायतदारांना होणे आवश्यक आहे. त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.
- औषधांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह
हापूसवर तुडतुडा, शेंडे पोखरणारी अळी, थ्रिप्स, फळमाशी यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी दरवर्षी औषधफवारणी करावी लागते. परंतु औषधांच्या परिणाकारकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा उत्पादन कमीच होते. फेब्रुवारी महिन्यात थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाला. विविध प्रकारची महागडी औषधे फवारून ६० ते ७० टक्के नियंत्रण ठेवण्यात बागायतर यशस्वी ठरले. त्याचवेळी आलेल्या बुरशीसाठीही फवारणी करावी लागली. याच कालावधीत तापमान ४० अंश सेल्सिअसने वाढले. दिवसा कडकडीत उन आणि पहाटे थंडीमुळे दव पडत असल्याने त्याचा विपरीत परिणाम आंब्यावर झाला. मोहोरावर दव पडून बुरशी पडली. तेव्हा तापमानामुळे मोहोरच जळून गेला. तर भाताएवढी बारीक कणीची गळ झाली. त्यामुळे मे महिन्यात आंबा कमी राहिला. त्यावेळी आंबा बागायतदारांनी मोहोर वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारली. परंतु तापमानापुढे औषधांचा टिकाव लागला नाही. तसेच कडकडीत उन्हामुळे थ्रिप्स शिल्लकच राहिला नाही. तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला तो जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महागडी औषधे फवारावी लागली. मात्र तो खर्च वाया गेला.
-----
कृषि विद्यापिठाने हे करावे
फवारणीचा खर्च कमी करण्यासाठी कोकण कृषि विद्यापिठ आणि कृषि विभागाकडून मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे. कोणत्यावेळी कोणती औषधं वापरली पाहिजेत याचे ज्ञान त्या-त्यावेळी दिले तर निश्चितच उत्पादन खर्च कमी करता येईल असे ज्येष्ठ बागायतदार आवर्जून सांगतात. तसेच प्रत्येक तालुक्यात जाऊन कोकण कृषि विद्यापिठाने अभ्यास केला पाहिजे, तरच हापूसचे भवितव्य चांगले राहणार आहे.
------
चौकट
शासनाकडून काय आहेत अपेक्षा
* हंगामाच्या स्थितीचा तज्ञ्जांकडून अभ्यास करावा
* औषधांवरील खर्च कमी करण्यासाठी किमतींवर बंधने
* शेतीपंपाचे वीजबिल कायमस्वपी माफीचा निर्णय हवा
* शेतीकर्जावरील व्याजदर ११ टक्केवरून ५ टक्के करावा
* कर्जाची मर्यादा ५० लाखापर्यंत करावी
* उत्पादन खर्चाच्या पटीत बाजारभावावर निर्णय पाहिजे
* कर्जमाफीकडे शासनाने लक्ष्य द्यावे
* कृषि विद्यापीठाने बागांमध्ये जाऊन अभ्यास करावा
------
चौकट
कराराने बागा घेतल्या तर एक पेटीसाठी येणारा उत्पादन खर्च
- फवारणी ः ५०० रुपये
- कामगार खर्च ः २०० रुपये
- रखवाली ः १०० रुपये
- बागा कराराचा खर्च ः ७०० ते १०००
- बागांसाठी खते ः १५० ते २००
- बागांची सफाई ः १०० ते २०० रुपये
- बागांना संरक्षण ः १०० रुपये
- फवारणीचे इंधन ः ५० रुपये
- वाहतूक खर्च ः २०० रुपये
- पेटी पॅकिंग व साहित्य ः २०० रुपये
- मजूरी ः २०० रुपये
* स्वतःची बागायती करणाऱ्याला खतापासून आंबा बाजारात पोचवेपर्यंत १२०० ते १४०० रुपये पेटीमागे खर्च येतो.
--------
चौकट
यंदाच्या हंगामावरील दृष्टिक्षेप
* हंगामात माल कमी
* उष्णतेमुळे एप्रिल महिन्यात सर्वाधिक आंबा
* बाजारातील दरावर परिणाम
* शेतकऱ्याला आर्थिक फटका
* उष्णतेमुळे फळात साका
* माल कमी, खर्च जास्त अशी स्थिती
* मोठ्या आकाराच्या फळात गाभा अधिक
* अवास्तव फवारणीने दर्जावर परिणाम
---
फोटो ओळी
- rat१८p१२.jpg-
64587
क्युआर कोड
चौकट
क्युआर कोडमुळे बाजारातील पत वाढतेय
गेल्या काही वर्षात कर्नाटकी आंबा हापूस नावाने बाजारात विकला जात होता. त्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय टॅग) प्राप्त झाल्यामुळे आळा बसत आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यातील आंबा हापूस नावाने विकला जाऊ लागला आहे. तसे जीआय सर्टीफिकेटही शेतकऱ्यांना देण्यास सुरूवात झाली. त्यासाठी कोकण कृषि विद्यापिठासह तीन संस्थाची निवड केली आहे. त्यात कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचाही समावेश आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजाराहून अधिक बागायतदारांनी जीआय नोंदणी केली आहे. सध्या भेसळ थांबविण्यासाठी क्यू आर कोडचा पर्याय काढला आहे. शेतकऱ्याला क्यूआर कोड स्टीकर दिला आहे. तो कोड स्कॅन केल्यानंतर त्यामध्ये बागायतदार कोण, बागेचा फोटो आणि फवारणीची सविस्तर माहिती मिळते. त्यामुळे चांगला आंबा असलेल्या बागायतदाराची बाजारातील पत वाढत आहे. २०२३ मध्ये अडीच लाख तर २०२४ मध्ये साडेतीन लाख स्टीकर विक्रीला गेले होते. यंदा ३ लाख स्टीकर वितरित करण्यात आले आहेत. त्याचा फायदाही बागायतदारांना मिळत असल्याचे संस्थेचे मुकुंद जोशी यांनी सांगितले.
------
कोट १
rat१८p५.jpg
64592
डॉ. विवेक भिडे
यंदा अक्षयतृतीयेला अनेक बागायतदारांकडील आंबा संपुष्टात आला होता. हे चित्र अपवादात्मक आहे. गेल्या चाळीस वर्षात अशी परिस्थिती उद्भवलेली नव्हती. वाशीसारख्या मोठ्या बाजारात एक लाख पेटी एका दिवशी कोकणातून दाखल झाली असे चित्र संपूर्ण हंगामात कधीच दिसले नाही. यावरून हंगामात बागायतदारांना किती फटका बसला हे दिसून येते. मार्च व एप्रिल या कालावधीत एकदम आंबा बाजारात आल्यामुळे हंगाम बरा गेल्याचे चित्र निर्माण झाले. प्रत्यक्षात बागायतदारांनी मोठी झळ बसली आहे.
- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार
-----
कोट २
rat१८p२.jpg-
64589
राजन कदम
हंगामातील स्थिती पाहता यावर्षी अनेक मोठ्या बागायतदारांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीचा शासनाने अभ्यास करून बागायतदारांना मदत केली पाहिजे. यंदा उत्पादन कमी राहिल्यामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे अनेक बागायतदारांना घेतलेले कर्ज फेडताना अडचण येणार आहे. तसेच पुढील वर्षीच्या हंगामासाठी भांडवल मिळवतानाही त्रास सहन करावा लागेल.
- राजन कदम, आंबा बागायतदार
---------------
कोट ३
- rat१८p४.jpg-
64591
डॉ. किरण मालशे
यंदा हापूस उत्पादनात घट निश्चित आहे. लांबलेल्या पावसामुळे फळधारणेवर परिणाम झाला. अपेक्षित थंडी पडलेली नाही. सातत्याने उष्णतेच्या लाटा येत होत्या. त्यामुळे फळगळ झाली. फळाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम झाला. काहीवेळा ढगाळ वातावरण राहिल्याने कीडरोगाला पोषक वातावरण तयार झाले. शेवटच्या टप्प्यात उष्णतेमुळे फळात साका होण्याचे प्रमाण अधिक होते. कोकण कृषि विद्यापिठाने थ्रिप्सवरील उपाययोजनासाठी निवडक बागांमध्ये प्रयोग केले आहेत. त्यात काहीअंशी यश मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांना परिस्थितीनुसार सल्लेही दिले होते. तरीही यंदा हंगामातील उत्पादन मिळण्याचे दिवसच कमी राहिले.
- डॉ. किरण मालशे, संशोधक, भाट्ये नारळ संशोधन केंद्र
-----
कोट
-rat१८p३.jpg-
64590
आनंद देसाई
यंदा कॅनिगला आंबा कमी मिळाला असला तरीही खरेदी ७ एप्रिलपासूनच सुरू झाली आहे. गेल्यावर्षीही दुसऱ्या आठवड्यात कॅनिंगची खरेदी सुरू झाली होती. यंदा किलोला दरही चांगला मिळाला आहे. काही छोट्या कॅनिंग व्यावसायिकांनी दर कमी झाला तेव्हा आंबा खरेदी करुन ठेवल्यामुळे त्यांना मालाची कमतरता जाणवणार नाही. परंतु यंदा कॅनिंग कंपन्या चालू राहण्याचा कालावधी तुलनेने कमी राहील. त्याचा फटका दरवर्षी हंगामी रोजगार मिळणाऱ्यांना बसणार आहे. तसेच उत्पादनातील घटीमुळे आमरसाचे दर २५ टक्केने वाढतील.
- आनंद देसाई, कॅनिंग व्यावसायिक
------
कोट
- rat१८p१.jpg-
64584
दिपक पवार
उत्पादन कमी असल्यामुळे यावर्षी आंबा पेट्यांच्या वाहतूक व्यावसायावर परिणाम झाला आहे. सुमारे ३० टक्केहून अधिक उत्पन्न यावर्षी कमी झाले आहे. एप्रिलमध्ये पेट्यांची संख्या कमी झाली होती. तसेच वाशीतील दर कमी झाल्याने बागायतदारांनी पुणे, अहमदाबादसह अन्य बाजारांच्याठिकाणी पेट्या पाठविल्या होत्या. या सर्व बदलांमुळे वाहतुकीमधून होणाऱ्या उलाढालीवर परिणाम होत आहे. सध्या पेट्या बाजारात जाण्याचे प्रमाण कमीच आहे.
- दीपक पवार, वाहतूक व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.