टेबल टेनिसपटू अंशिताचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
64648
टेबल टेनिसपटू अंशिताचा
राज्यपालांच्या हस्ते गौरव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळिस्ते (ता. कणकवली) येथील टेबल टेनिस खेळाडू अंशिता ताह्मणकर हिचा मुंबई येथे विशेष कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंशिता ही मुंबईतील प्रख्यात टेबल टेनिसपटू असून तिने मुंबईचे कर्णधारपद भूषविले आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ३५ व्या पुरस्कार वितरण समारंभात टेबल टेनिस खेळातील विशेष कामगिरीबद्दल तिचा गौरव करण्यात आला. सध्या ती परेश मुरेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिने पदकांची कमाई केली आहे.
....................
64651
तिरंगा यात्रेस
देवगडात प्रतिसाद
देवगड, ता. १८ : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. येथील उद्यान गणेश मंदिर ते येथील बसस्थानक अशी ही तिरंगा यात्रा होती. यामध्ये विविध मान्यवर सहभागी झाले.
यावेळी ठिकठिकाणी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. बसस्थानक परिसरात राष्ट्रगीताने यात्रेची सांगता झाली. यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, जिल्हा बँक संचालक ॲड. प्रकाश बोडस, बाळ खडपे, माजी सभापती सुनील पारकर, देवगड ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, प्रकाश राणे, राजेंद्र वालकर यांच्यासह देशप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.