रत्नागिरी ः ११२८ अंगणवाड्यांना प्रतीक्षा स्वमालकीच्या जागेची
rat18p21.jpg
64660
रत्नागिरी ः नव्याने बांधण्यात आलेली अंगणवाडीची इमारत.
--------
११२८ अंगणवाड्यांना प्रतीक्षा स्वमालकीच्या जागेची
जागेचा प्रश्न प्रलंबित; नियोजन समितीमधून निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी अनुदान असतानाही जमीन मिळत नसल्यामुळे तब्बल १ हजार २१८ म्हणेजच ४४ टक्के अंगणवाड्यांना स्वतःच्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यातील २५८ अंगणवाड्या तर समाज मंदिर व सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी २ हजार ८१४ अंगणवाड्या मंजूर असून, त्या सर्व अंगणवाड्या कार्यरत आहेत. जिल्ह्यातील १ हजार २१८ अंगणवाड्यांना स्वतःच्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामुळे काही अंगणवाड्या खासगी इमारतीमध्ये, प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये, तर काही अंगणवाड्या समाज मंदिरात व सार्वजनिक ठिकाणी भरविण्यात येतात. या अंगणवाड्यांसाठी स्वतःच्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी जागाच मिळत नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षे तसाच आहे. जिल्ह्यात ४३८ अंगवाड्या खासगी इमारतीमध्ये भरवण्यात येतात. ५२२ अंगणवाड्या प्राथमिक शाळांचा आश्रय घेतला आहे; तर २५८ अंगणवाड्यांना गावातील समाजमंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणांचा आधार देण्यात आला आहे. अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी जमीन मिळावी यासाठी दानशूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून वेळोवेळी आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रश्न सुटलेला नाही. जिल्ह्यात ४३८ अंगणवाड्या खासगी इमारतीमध्ये भरविण्यात येतात. या इमारत मालकांना मासिक १ हजार रुपये भाड्यापोटी देण्यात येतात. या अंगवाड्यांच्या भाड्यापोटी वर्षाला ५२ लाख ५६ हजार रुपये शासनाकडून इमारत मालकांना दिले जातात. खासगी इमारतीत भरविण्यात येणाऱ्या अंगणवाड्या ४३८, शाळांच्या वर्गखोल्यात भरविण्यात येणाऱ्या अंगणवाड्या ५२२, तर समाज मंदिरात भरविण्यात येणाऱ्या २५८ अंगणवाड्या आहेत.
--------
चौकट
इमारत नसलेल्या अंगणवाड्या
तालुका अंगणवाड्या
* मंडणगड ९७
* दापोली १४६
* खेड १४९
* चिपळूण १५३
* गुहागर ९०
* संगमेश्वर १५८
* रत्नागिरी १५०
* लांजा ६९
* राजापूर २०६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.