सहलीतून एसटीला ९० लाखांचे उत्पन्न

सहलीतून एसटीला ९० लाखांचे उत्पन्न

Published on

-rat१८p१९.jpg-
२५N६४६४०
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी आगाराची लालपरी.
-------
शैक्षणिक सहलीतून ९० लाखांचे उत्पन्न
रत्नागिरी एसटी आगार ; ४३७ फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : रत्नागिरी एसटी आगाराला शैक्षणिक सहलीसाठी सोडलेल्या जादा फेऱ्यांतून जवळपास १३ महिन्यांत ९० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रासंगिक करारांतर्गत ४३७ फेऱ्या सहलीसाठी आरक्षित केल्या होत्या. यामुळे एसटीचे उत्पन्न वाढले आहे.
उन्हाळ्याच्या सुटीत रत्नागिरी शहर, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या शाळा, खासगी महाविद्यालयांनी रत्नागिरीसह कोकणातील इतर भागांत शैक्षणिक सहली आयोजित केल्या. एप्रिल २०२४ ते मे २०२५ या शैक्षणिक सहलीसाठी रत्नागिरी आगाराच्या एकूण ४३७ एसटी फेऱ्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. यामध्ये रत्नागिरी आगाराला ९० लाखांचे उत्पन्न मिळाले. या एसटी गाड्यांनी २ लाख १० हजार ४१० किलोमीटरचा प्रवास केला.
वर्षभर तासिका, अभ्यास, सराव यासह विविध उपक्रमांत शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व्यस्त असतात. त्यामुळे वर्षातून एकदा विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी व त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी, पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाटी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते. रत्नागिरीच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन ही सहल काढण्यात आली. यामध्ये सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी महिन्यात एसटी बसेसचे सर्वाधिक आरक्षण करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी वगळता मार्च, एप्रिल, मे महिन्यात आरक्षित एसटीची संख्या कमी झाली. एकंदरीत विशेष बस सेवा अंतर्गत शैक्षणिक सहलीतून रत्नागिरी आगारास ९० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले.
-------
महिना* आरक्षित बस* उत्पन्न (रुपयांत)
एप्रिल* ३०* ३ लाख ९९ हजार ३००
मे* ३५* ३ लाख ५ हजार ५२५
जून* १०* ३ लाख ४७ हजार ८७५
सप्टेंबर* १७* ७ लाख ४२ हजार ५००
ऑक्टोबर* ३९* ११ लाख ८३ हजार
नोव्हेंबर* ३१* ६ लाख ३५ हजार ८००
डिसेंबर* ७९* १६ लाख ५० हजार ९६३
जानेवारी* ६९* ९ लाख ८२ हजार ४५३
फेब्रुवारी* ५४* ९ लाख ८२ हजार ४५३
---------
या ठिकाणांना पसंती
शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी गणपतीपुळे, आरे वारे किनारा, वॉटरपार्क, थिबा पॅलेस, प्राचीन कोकण, पावस, गणेशगुळे, कशेळी कनकादित्य मंदिर, मालवण, सिंधुदुर्ग किल्ला, रत्नदुर्ग किल्ला या ठिकाणांना जास्त पसंती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com