लाईव्ह न्यूज

धोपेश्वरघाटातील स्मशानभूमीची श्रमदानातून स्वच्छता

धोपेश्वरघाटातील स्मशानभूमीची श्रमदानातून स्वच्छता
Published on: 

काही सुखद--लोगो

ओळी
- rat19p3.jpg-
25N64772
राजापूर ः स्मशानभूमीच्या इमारतीवरील गवत काढताना ग्रामस्थ.
- rat19p4.jpg-
OP25N64773
राजापूर ः माती काढून स्वच्छता करताना ग्रामस्थ.
- rat19p5.jpg ः
25N64774
पाण्याची टाकी परिसराची सुरू असलेली स्वच्छता.
- rat19p6.jpg ः
OP25N64775
स्वच्छ आणि सुंदर झालेला स्मशानभूमी परिसर.
- rat19p7.jpg ः
25N64776
स्वच्छ झालेला शवदाहिनी परिसर.
- rat19p8.jpg ः
25N64777
स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले श्री धूतपापेश्वर युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
- rat19p9.jpg ः
25N64778
स्मशानभूमी परिसराची सुरू असलेली स्वच्छता.
- rat19p10.jpg ः
P25N64770
स्वच्छ झालेल्या स्मशानभूमीच्या परिसरामध्ये फेरफटका मारताना ग्रामस्थ.
P25N64775


धोपेश्वरघाट स्मशानभूमीची श्रमदानातून स्वच्छता
युवक मंडळाचा उपक्रम; रूपडे पालटले, पावसाळ्यातील गैरसोय दूर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ ः शहरातील धोपेश्वरघाटी येथील श्री धूतपापेश्वर युवक मंडळाच्या माध्यमातून शहरातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये श्रमदानातून स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत वैकुंठ स्मशानभूमीतील शवदाहिनी व परिसरातील कचरा, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमीचे रूपडेच पालटून गेले.
शहरातील आंबेवाडी परिसरात वैकुंठ स्मशानभूमी असून, या ठिकाणी परिसरातील झाडीझुडपांमुळे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा गोळा होतो. शवदाहिनी व अन्य इमारतींवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील धोपेश्वरघाटी येथील श्री धूतपापेश्वर युवक मंडळाने रविवारी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. स्मशानभूमी परिसरातील शवदाहिनीतील राख, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. सरणासाठी लागणारी लाकडे योग्य पद्धतीने तोडून ती व्यवस्थित रचून ठेवण्यात आली. पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत ही मोहीम राबवण्यात आली.
धूतपापेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र कोंबेकर, उपाध्यक्ष सुनील बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली सतीश तांबे, संजय बोटले, प्रवीण बोटले, सुरेंद्र तांबे, संतोष चव्हाण, रवींद्र बावधनकर, कुंदन शिंदे, सहदेव पारकर, अविनाश तांबे, प्रशांत मांजरेकर, विनोद तांबे, रक्षित साखरकर, पंकज बावधनकर, मंगेश, महेश बाकाळकर, अण्णा तांबे, केतन तांबे, राजीव साखरकर, रमेश रहाटे, तेजस कांबळे, शौर्य बावधनकर अशी वाडीतील तरुण मंडळी व प्रौढ मंडळी या मोहिमेत सहभागी झाली होती.

--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com