बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
- rat१९p२.jpg-
: KOP२५N६४७७१
संगमेश्वर ः गुणवंत विद्यार्थी व शिक्षक.
बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
देवरूख शिक्षण मंडळ ; भविष्यातील आव्हानांवर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १९ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२वी (एचएससी) मधील परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केला होता. बारावीत अव्वल ठरलेल्या पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आले.
देवरूख येथे झालेल्या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. सुवर्णा साळवी, मुख्याध्यापक मधुकर कोकणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला प्रा. सीमा शेट्ये, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. शिवराज कांबळे, प्रा. अभिनय पातेरे आणि प्रा. धनंजय दळवी यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, पालक व नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहा शेट्ये, मानसी माने, साईमा मेमन, वैष्णवी आगरे, तन्वी साळुंखे. कला शाखेतील श्रावणी पावले, ऋतुजा मुंडेकर, समृद्धी चव्हाण, आचल बांडागळे, सई मुंडेकर; एमसीव्हीसी विभागातील आकाश पर्शराम, सागर मांगले, तनिष्का चव्हाण, दिक्षा गेल्ये, प्रिती चाचे; पाध्ये कॉलेजमधील जान्हवी जाधव, शंतनू करंबेळे, श्रावण पातेरे, शुभम साने, हर्ष डोंगरे; सप्रे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रियांका गवंडी, राज अडबल, तेजस्विनी भालेकर, श्रेया बडद, श्रेया चाचे यांचा समावेश होता.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी नवीन शैक्षणिक पद्धती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना आवडत्या विषयात करियर करण्याच्या असणाऱ्या उत्तम संधी याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्ष सदानंद भागवत यांनी भविष्यातील विविध आव्हाने, विविध क्षेत्रांमध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी, समाजाप्रती विद्यार्थ्यांची असणारी जबाबदारी व कर्तव्य आणि राष्ट्रविकासातील विद्यार्थ्यांचे महत्वपूर्ण योगदान याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरेश राणे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.