विवेकानंद वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
विवेकानंद वसतिगृहात
प्रवेश सुरू
रत्नागिरी ः राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या झाडगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यार्थी वसतिगृहात पाचवी ते बारावीपर्यंतच्या मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतिगृहामध्ये इतर मागास ६५ टक्के, अनु. जातीजमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग २० टक्के, आर्थिक मागास १५ टक्के व अपंगासाठी ३ टक्के या आरक्षणानुसार गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. सर्व प्रकारच्या सोईंनीयुक्त या वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी वसतिगृहाच्या प्रवेशअर्जासह विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, पालाकांचा उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला, आधारकार्ड, गुणपत्रक व चार फोटोसह प्रवेश निश्चित करावा. प्रवेशासाठी मुख्याध्यापक व अध्यक्ष ए. डी. पाटील आणि वसतिगृह अधीक्षक जी. पी. बागडी यांच्याशी संपर्क साधावा.
--
-rat१९p११.jpg-
२५N६४७९८
आदिती पालकर
-----
‘लक्ष्मीकेशव’चा
निकाल शंभर टक्के
रत्नागिरी ः शहरानजीकच्या कसोप-फणसोप येथील श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयातील आदिती पालकर हिने ९०.४० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला. उत्सवी गुळेकर ८७.२० द्वितीय आणि ऋग्वेद गवाणकरने (८६.२०) तृतीय क्रमांक मिळवला.
--
राजापूर आयटीआयत
प्रवेशप्रक्रिया सुरू
राजापूर ः येधील मधू दंडवते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रवेशअर्ज सादर करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य टी. एस. मिसाळ यांनी केले आहे. या संस्थेमध्ये एक वर्ष कालावधीकरिता मेकॅनिक डिझेल ४८ जागा, शिटमेटल वर्कर २०, ड्रेस मेकिंग २० साठी जागा उपलब्ध आहेत तसेच दोन वर्ष कालावधीकरिता वीजतंत्री २० जागा, प्रशीतन व वातानुकूलित टेक्निशियन ( RAC ) २४ हे अभ्यासक्रम आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.