घंटा वाजली, मुले जमली... शाळा भऱली
swt202.jpg
65024
पाटः हायस्कूलच्या १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा अनुभव घेतला.
घंटा वाजली, मुले जमली...शाळा भऱली
पाटमधील स्नेहमेळावाः १९९६ च्या वर्गाने घेतला बालपणाचा आनंद
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २० ः सर्व माध्यमिक शाळांचा १९९५-९६ हा सुवर्णकाळ. मुलांची संख्या, शिक्षकांची संख्या, संस्थांना मिळणारे अनुदान मुबलक होते. आज परिस्थिती बदललेली असताना माजी विद्यार्थी म्हणून मुलांची शाळेकडे ओढ असतेच. पाट हायस्कूलच्या १९९६ च्या दहावीच्या पाचही तुकड्यांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा शाळेचा अनुभव घेतला. घंटा वाजवून शाळा भरली. परिपाठ घेत वर्ग भरविला. सर्व शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक यांनीही मनोगत व्यक्त केले. जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून हा दिवस आनंदात साजरा केला.
कोणतेही उपलब्धी विनामूल्य मिळत नाही, त्याची काही ना काही किंमत चुकवावी लागते. पंचेचाळीस वर्षांच्या जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना माजी विद्यार्थ्यांना पुन्हा लहान व्हावेसे वाटले. रांगेत शाळेत जातात तशी शाळा भरविली. लहानपणाचा आनंद लुटला आणि रीलही बनविल्या. तीस वर्षांनंतर भेट झाल्यामुळे प्रत्येकाने ओळख पटविली. पाट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी प्रास्ताविक केले. संदीप साळसकर, रामचंद्र ठाकूर, शैवाली परब, ज्योत्स्ना देसाई, संस्था संचालक राजेश सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा आणि मुलांसाठी भरीव मदत देण्याचे सर्व विद्यार्थ्यांनी आश्वासन दिले. शाळेच्या प्रगतीमध्ये विशेष लक्ष देण्याचा मानस व्यक्त केला. राजेश सामंत यांनी मागील काळातील संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. श्री. हंजनकर यांनी शाळेच्या विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाचा आढावा घेतला. त्यानंतर कला मंदिरामध्ये कलाशिक्षक संदीप साळस्कर यांनी कलावर्ग घेतला. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अशा प्रकारे पूर्ण दिवस आनंदी वातावरणात घालवीत सर्वांनी पुन्हा पुन्हा शाळेमध्ये येण्याचे मनोमन ठरविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.