रत्नागिरी -माणसाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांचे दर्शन संग्रहात
rat२०p२१.jpg, rat२०p२२.jpg-
६५०३८
६५०३९
वस्तुसंग्रहालयातील दुर्मिळ ठेवा.
मालिका भाग - २
कोकणच्या मानबिंदूचे जतन - लोगो
माणसाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांचे दर्शन संग्रहातून
मौर्यकाळापासूनचा मोठा पट; दुर्मिळ दाभोळची लारी उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०ः मौर्यकाळापासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंतच्या काळातील वेगवेगळ्या वस्तू या संग्रहालयात आहेत. नाण्यांचा मोठा संग्रह आहे. आदिलशाहीच्या काळात असलेली नाणी तसेच सुप्रसिद्ध; परंतु दुर्मिळ असलेली दाभोळी लारी हे नाणे या संग्रही आहे. तत्कालीन स्नानगृहांची रचना, दुर्मिळ प्रेशरकुकर एवढेच काय तर सातवाहनकालीन जातेही येथे पाहायला मिळते. थोडक्यात माणूस उत्क्रांत कसा होत गेला, हे वेगवेगळ्या काळातील वस्तूंच्या आधारे संग्रहात मांडले आहे, असे प्रज्ञा इंगवले-काळसेकर यांनी सांगितले.
चिपळूण येथील वस्तुसंग्रहालयाबाबत इंगवले यांनी सविस्तर माहिती दिली. चिपळूणमधील हे वस्तुसंग्रहालय वातानुकूलित असले पाहिजे. सूर्याचा नेहमीचा प्रकाशही तिव्रतेने असता कामा नये. काही भाग हवाबंद असावा लागतो. दगडी वस्तू तसेच मातीच्या वस्तू, कागद याच्यावर वातावरणाचा परिणाम होतो. म्हणून वरील बाबी आवश्यक असतात. आपल्याकडील दमट वातावरण आणि प्रकाश या संग्रहातील वस्तूंच्या जैविक स्थितीवर परिणाम करतात. त्यामुळे वरील काळजी घ्यावी लागते. ती घ्यायची तर खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो. काटकसर आणि तरीही संग्रहातील वस्तू उत्तम राहिल्या पाहिजेत, या दोन्हीचा सुवर्णमध्य साधण्याची कसरत संग्रहालायीच मांडणी करताना करावी लागली.
संग्रहालयाची इमारत आधी तयार झाली असल्यामुळे वस्तूंच्या मांडणीनुरूप बांधकाम करणे शक्य नव्हते तरीही शास्त्रशुद्ध पद्धतीने संग्रहालयाची मांडणी झाली आहे. कोकणातील दमट हवामान, पावसाचे प्रमाण, काही वस्तू, चित्रे, दस्त यांना पाणी लागले तर ती खराब होतात. हे टाळण्यासाठी या द्वयीने मोठी भूमिका बजावली आहे. मातीच्या वस्तूंचे नुकसान हवामानाने तसेच बुरशीनेही होते. संग्रहालयातील वस्तू तर पार पुरात भिजल्या होत्या. या द्वयीने ही सगळी सामुग्री स्वच्छ केली. संग्रहालयाच्या मांडणीसाठी करावयाच्या प्राथमिक कामात किमान सात ते आठ महिने या द्वयीचे गेले. चिपळूणची कन्या आणि जावई या भावनेने या द्वयीने अत्यल्प मोबदल्यात हे काम केले.
चौकट
काटकसरीने वस्तुसंग्रहालयाची उभारणी
चिपळुणातील या वस्तुसंग्रहालयाची रचना करताना वस्तूंची ने-आण टाळायची, आतील प्रकाशयोजना, सुतारकाम, वेगळ्या काचा बसवू शकलो नाही तरी त्याला काही पर्याय, कमीतकमी तोडफोड आणि कमीतकमी नुकसान हे मुद्दे डोक्यात ठेवून या मर्यादा ध्यानात घेऊन बजेटफ्रेंडली म्हणजे काटकसरीने वस्तुसंग्रहालयाची उभारणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.