रत्नागिरी जिल्ह्यात धावणार लवकरच 30 ई-बसेस

रत्नागिरी जिल्ह्यात धावणार लवकरच 30 ई-बसेस

Published on

rat२०p२५.jpg
६५०४६
रत्नागिरीः जिल्ह्यात अशा प्रकारच्या ई-बसेस दाखल होणार आहेत.
-------

जिल्ह्यात धावणार लवकरच ३० ई-बसेस
रत्नागिरी, खेड, दापोलीत चार्जिंग सेंटर; महावितरणकडून जोडणी
राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांची परिस्थिती तेवढी चांगली नसली तरी आता नवीन गाड्या ताफ्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच तीस नवीन बसेस एसटी ताफ्यात सामिल झाल्या. आता लवकरच प्रदूषणविरहित ३० ई-बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, दापोली आणि खेड आगारात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम महावितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात ई-बसेस सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या सुमारे ७२० बसेस धावतात. त्यात ३४ शिवशाही, २६ स्लिपर, ४० सिटी बसचा समावेश आहे तर ४० बसेस भाड्याने घेतल्या आहेत. त्यामुळे सुस्थितीत असेलल्या गाड्यांची रत्नागिरीत तशी वानवाच आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी आजही एसटी जीवनवाहिनी मानली जाते. त्यात शासनाने महिलांसह वयोवृद्धांना दिलेल्या विविध योजनांमुळे प्रवाशांचा एसटीकडील कल वाढत आहे तसेच भाडेवाडीमुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडली आहे. सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशांना काही दिवसांपूर्वी ३० नवीन एसटी बसेस घेण्यात आल्या आहेत. आता एमआयडीसीच्या माध्यमातून सर्व बसस्थानके हायटेक होत आहेत. त्यामुळे एसटीला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवास चांगला होण्यासाठी ३० ई-बसेस घेण्यात येणार आहेत. एसटीच्या जुन्या गाड्या प्रदूषणकारी आहेत. त्यावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी शासनाने विजेवर चालणाऱ्या ई-बसेस आणल्या आहेत. त्यामुळे डिझेलवर होणारा सुमारे लाखो रुपयाचा खर्च कमी होणार आहे तसेच एसटीच्या उत्पन्नातही भर पडेल. ई-बससेसाठी लागणारी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरीत माळनाका येथील आगारात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू झालेले आहे. महावितरण कंपनीने त्यासाठी जोडणी दिली आहे. खेड, दापोली आगारातदेखील हे काम सुरू आहे. चार्जिंग स्टेशनची कामे झाल्यानंतर या ई-बसेस जिल्ह्यात दाखल होतील.

चौकट
दृष्टिक्षेपात...
* रत्नागिरी विभागाच्या ८५० पैकी ६७० गाड्या
* ५८ गाड्या वापराविना
* काही गाड्या भंगारात
* नवीन गाड्यांची कमी

कोट
जिल्ह्यासाठी ३० ई-बसेस मंजूर आहेत. त्यासाठी रत्नागिरी, खेड, दापोली आगारामध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. महावितरणकडून जोडण्या मिळाल्या आहेत. लवकरच चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होईल म्हणजे आपल्याला ई-बसेस मिळतील.
- प्रज्ञेश बोरसे, एसटी विभाग नियंत्रक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com