बुद्धिबळ स्पर्धेत वरद पेठे, सई प्रभुदेसाई विजयी
- rat२१p३६.jpg-
P२५N६५३२६
जी. एच. रायसोनी स्मृती बुद्धिबळ स्पर्धेतील यशस्वी खेळाडू.
-----
बुद्धिबळमध्ये वरद पेठे, सई प्रभुदेसाई विजयी
जी. एच. रायसोनी स्मृती स्पर्धा ; आठ खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः शिर्के प्रशालेच्या रंजनमंदिर सभागृहात रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात वरद पेठे तर महिला गटात सई प्रभुदेसाईने विजेतेपद पटकावले. खुल्या व महिलांच्या गटातून प्रत्येकी ४ खेळाडूंची निवड राज्यस्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
खुल्या व महिला गटांच्या स्पर्धेच्या पारितोषिक कार्यक्रमाला फिडे मानांकित खेळाडू अनंत गोखले व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्रीकांत दुदगीकर उपस्थित होते. दुदगीकर यांनी बुद्धिबळ हा खेळ आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्वावर कसा बदल घडवू शकतो यावर खेळाडूंना मार्गदर्शन केले. एकाग्रता, संयम, मेहनत आणि चिकाटी ही यशाची चतुःसूत्री मुलांना सांगत उपस्थित पालकांची वाहवा मिळवली.
या स्पर्धेत निधी मुळ्ये हिने तुलनेने अधिक काठीण्य पातळी असलेल्या खुल्या गटात खेळून आपल्या खेळाचा कस पणाला लावत खुल्या गटातून जिल्हा संघात स्थान मिळवले. वरद पेठे व सई प्रभुदेसाई यांनी आपापल्या गटामध्ये विजेतेपद पटकावत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले तसेच अनिकेत रेडीज, यश गोगटे यांनी नावलौकिकाला साजेसा खेळ केला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, शिर्के प्रशालेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रायसोनी फाउंडेशनकडून स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आले होते. विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी पंच म्हणून काम पहिले.
---
स्पर्धेतील विजयी खेळाडू
विजेत्यांची नावे अशी (प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथा, उत्तेजनार्थ अशी) - महिला गट ः सई प्रभुदेसाई, तनया आंब्रे, मृणाल कुंभार, आदिती पाटील, सानवी दामले, आर्या पळसुलेदेसाई. खुला गट ः वरद पेठे, यश गोगटे, अनिकेत रेडिज, निधी मुळे, अपूर्व बंडसोडे, आयुष रायकर, विहंग सावंत. सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू – सुहास कामतेकर. विविध गटांतील विजेते : वरद पेठे (खुला गट), अर्णव चव्हाण (१५ वर्षे गट), सई प्रभुदेसाई (१५ वर्षे व महिला गट), विहंग सावंत (९ वर्षे गट).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.