-चिपळुणात सलग तिसऱ्या दिवशीही जोर‌‘धार‌

-चिपळुणात सलग तिसऱ्या दिवशीही जोर‌‘धार‌

Published on

-rat२२p३०.jpg-
२५N६५६३६
चिपळूण ः पावसामुळे तुंबलेली गटारे साफ करताना नगर पालिकेचे सफाई कर्मचारी.
---------
चिपळुणात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस
घरात पाणी शिरण्याचे प्रकार ; नगरपालिका प्रशासन सतर्क
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २२ ः मॉन्सूनपूर्व पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावत चिपळुणात दाणादाण उडवली. बुधवारी कोसळलेल्या पावसात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील डीबीजे महाविद्यालयासमोर तसेच शिवाजीनगर बसस्थानक परिसरात महामार्गावर पाणी साचून ते पाणी काही घरात शिरले. यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी गटारे तुंबून रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या. पावसाळ्यापूर्वीच पाणी तुंबण्याचे प्रकार समोर येताच मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा स्वच्छता व आरोग्य विभाग सतर्क होत ठिकठिकाणी तुंबलेले व रस्त्यांवर साचलेल्या पाण्याची वाट मोकळी करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
चिपळुणात गेले दोन-तीन दिवस मॉन्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. दुपारनंतर आकाशात काळे ढग जमून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होत आहे. दोन दिवस शहराला पावसाने झोडपल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी दुपारनंतरही पाऊस सुरू झाला तो सायंकाळ उशिरापर्यंत पडत होता. भरपावसात चिपळूण नगर पालिकेचे कर्मचारी नाले व गटारसफाईच्या कामात व्यस्त झाले होते. शहर परिसरातून आलेल्या तक्रारी तत्काळ निकाली काढण्यासाठी आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कामाला लागले होते. ज्या भागात पाणी साचले आहे, गटारातून पाणी निचरा होत नाही अशा ठिकाणी जाऊन तेथील मार्ग मोकळा केला जात आहे. विरेश्वर कॉलनी, बाजारपेठ, गोवळकोट रोड, मुरादपूर, पाग तसेच महामार्गालगत असलेल्या नागगरिकांना पावसाच्या पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. भरपावसात हे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यक तेथे जेसीबी व अधिक कामगार लावून हे काम केले जात आहे. पहिला पाऊस असल्याने ठिकठिकाणी पाणी साचणे, गटार तुंबणे असे प्रकार होत आहेत. नागरिकांनी यासाठी पालिकेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com