गडनदी बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा कायम
65767
गडनदी बंधाऱ्यांतील साठ्यामुळे आधार
टंचाईचा धोका टळला, फळ्या हटविण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २३ ः उन्हाळी हंगामामध्ये गडनदीपात्रामध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येते. मात्र, मुसळधार पावसानंतरही नदी नाले भरून वाहू लागले असले तरी गडनदी पात्रातील बंधाऱ्यासाठी घातलेल्या फळ्या अजूनही जैसे थे आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा होऊ लागला आहे. या फळ्या वेळीच न हटवल्यास नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांना धोक्याची शक्यता आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
नरडवे धरण प्रकल्प अंतर्गत गडनदीपात्रामध्ये दहा ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. उन्हाळ्यात या बंधाऱ्यांमध्ये फळ्या टाकून पाणी अडवले जाते. यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाल्यामुळे बंधाऱ्यांच्या फळ्या हटविलेल्या नाहीत. गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडनदी पात्रांमध्ये पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे आता या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ लागला आहे. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जलसंपदा विभागाकडून ठेकेदाराला बंधाऱ्यातील फळ्या काढणे बंधनकारक आहे. जेणेकरून नदीपात्रातील पाणी वाहून जाईल. मात्र, अद्यापही या बंधाऱ्यातील फळ्या काढलेल्या नाहीत. त्यामुळे मुसळधार पावसामुळे गडनदीपात्र ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. सध्या सह्याद्री पट्ट्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी नाल्यांना हळूहळू पाणीसाठा होऊ लागला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गडनदीला पूर येऊ शकतो. यात बंधाऱ्यावरून पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडनदी पात्रातील जागोजागी घातलेले कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि त्यामध्ये सुरू असलेला पाणीसाठा उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त ठरतो. मात्र, यंदा पावसाला सुरुवात झाली असल्याने पाणीटंचाई उद्भवलेली नाही. मात्र, पावसाला सुरुवात होऊनही बंधाऱ्यातील पाणीसाठा अजूनही कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.