

rat23p8.jpg-
KOP25N65775 Page
संगमेश्वर ः कोंडअसुर्डे येथे विजेचे खांब वाकल्याने या परिसरातील गावे अंधारात आहेत.
-----------
कोंडअसुर्डे परिसरातील गावे अंधारात
संगमेश्वर, ता. २३ः तालुक्यात बुधवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास संगमेश्वर येथील पारेख पेट्रोलपंपाजवळ महामार्गाच्या कामादरम्यान माती काढताना वडाचे झाड कोसळले. या घटनेमुळे कसबा उच्चदाब वाहिनीचे सहा वीजखांब वाकले. महावितरणने तातडीने कामाला सुरवात केली. गुरूवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत तीन नवीन खांब उभारून तारा ओढण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे काल आणि आज रामपेठ, मापारीमोहल्ला (काही भाग), आयटीआयजवळील परिसर, सह्याद्री नगर आणि पुनर्वसन आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
भरपावसात दिवसभर काम करूनही कामाचे प्रमाण जास्त असल्याने कोंडअसुर्डे, मौजेअसुर्डे आणि मापारीमोहल्ला येथील वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, या भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. महावितरण संगमेश्वरने खंडित वीजपुरवठ्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला असून, नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.