वेंगुर्लेत उद्या वैद्यकीय शिबिराचे आयोजन

वेंगुर्लेत उद्या वैद्यकीय शिबिराचे आयोजन

Published on

65780

वेंगुर्लेत उद्या वैद्यकीय शिबिराचे आयोजन

तज्ज्ञांद्वारे होणार चिकित्सा; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २३ ः श्री मठ संस्थान दाभोली, कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ, पूर्णानंद सेवा समितीतर्फे तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश गाळवणकर आणि उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले, वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या सहकार्याने वेंगुर्ले येथे मोफत बहुद्देशिय वैद्यकीय शिबिर आयोजित केले आहे. यात तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे तपासणी करण्यात येणार असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी आयोजक सचिन वालावलकर, वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र लिलजे, डॉ. उल्हास तेंडुलकर, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, पूर्णांनंद सेवा समिती अध्यक्ष तथा कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ अध्यक्ष योगेश सामंत आदी उपस्थित होते.
श्री. वालावलकर म्हणाले, ‘‘येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी (ता.२५) सकाळी १० ते दुपारी २ या वेळात हे शिबिर आयोजित केले आहे. याचे उद्‍घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व फोंडा गोवा येथील उद्योजक वि. तू. प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विषेश अतिथी म्हणून माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार किरण सामंत, उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत, जिजामाता पूरस्कार विजेत्या स्वरूपा रवींद्र सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सावंत, तालुका वैयकीय अधिकाऱ्यांनी बहुमोल सहकार्य केले आहे. डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलची डॉक्टरची टीम या शिबिरात तपासणी करणार आहे. ग्रामीण भागाच्या ठिकाणी ३० ते ४० नागरिक जमल्यास वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.’’
डॉ. तेंडुलकर म्हणाले, ‘‘शिबिरात नेत्रविकार तपासणी, स्त्रीरोग तपासणी व मार्गदर्शन, बालरोग तपासणी व मार्गदर्शन, कर्करोग तपासणी, नाक- कान-घसा तपासणी, ऍक्युप्रेशर तज्ज्ञांद्वारे उपचार व मार्गदर्शन, त्वचारोग तपासणी, चेस्ट फिजिशियन, फिजिओथेरपी (डायथर्मी) उपचार, हृदयविकार तपासणी, दंत चिकित्सा, रक्त तपासणी, पी.एफ.टी., नेत्रचिकित्सा, मोफत चष्मे वाटप, अस्थीरोग चिकित्सा आदी सुविधा असतील. या शिबिरात मुंबई व डेरवण येथील तज्ज्ञ डॉक्टर्सद्वारे रुग्ण चिकित्सा करण्यात येणार असून यात जनरल सर्जन डॉ. अंकिता हुले, जनरल मेडिसिन डॉ. राज देसाई, ऑप्थल डॉ. रिया साळुंके, गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. निहारिका राहुल, ऑप्थोपेडिक डॉ. अपूर्वा दुबे, इएनटी डॉ प्रतीक शहाणे यांचा समावेश आहे. मोफत औषधे देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव बनवण्यासाठी माप घेण्यात येणार असून आहे. शासनाच्या महालॅब मार्फत सर्व रक्त, लघवी तपासण्या सुद्धा मोफत होणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com