

65898
65845
देवगड तालुक्यात नुकसान सत्र सुरूच
१०६ मि.मी. पावसाची नोंद; फणसगाव, कुवळेत घरांवर झाडे कोसळली
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः तालुक्याच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे नुकसानीचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील फणसगाव, कुवळे भागात झाडे पडून घरांचे नुकसान झाले आहे. किनारी भागात पावसाची संततधार कायम आहे. पावसाने कहर केला असून गेल्या चोवीस तासांत आज सकाळपर्यंत येथे १०६ मिलिमीटर इतका पाऊस झाला. यंदाच्या हंगामात पूर्व मोसमी पावसाने सुरूवातीलाच २२५ मिलिमीटर इतका टप्पा गाठला आहे.
तालुक्याच्या किनारी भागात मॉन्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरू आहे. किनारी भागाला वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नुकसानीचे सत्र सुरूच आहे. ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेकांचे वार्षिक नियोजन कोलमडले आहे. चार दिवसांपासून किनारी भागांत संततधार कायम आहे. फणसगाव येथे आज सकाळी एका घराच्या पडवीवर आंब्याचे झाड पडून सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले. कुवळे-घाडीवाडी येथील एका कौलारू घरावर पहाटे माड पडून छप्पराचे ८ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीची महसूल यंत्रणेने माहिती घेतली. तालुक्याच्या किनारी भागाला पाऊस चांगलाच झोडपून काढत असून आज सकाळपर्यंत येथे १०६ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली. अद्यापही वातावरण निवळले नसल्याने पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.