मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकरी अडचणीत

मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकरी अडचणीत

Published on

-rat२३p१०.jpg -
P२५N६५७६९
राजापूर ः पावसाच्या पाण्याने भेरलेल्या भातखाचरामुळे शेतकऱ्याचे पेरणीचे नियोजन बिघडले आहे.
-------
मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकरी अडचणीत
मशागतीची अंतीम टप्प्यातील कामे रखडली ; खरीपाच्या नियोजावर पाणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका कातळ परिसरामध्ये शेतकऱ्‍यांकडून केल्या जाणाऱ्या धूळफेक पेरण्यांना बसला असून, शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. आणखीन काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास खरिपाच्या पेरण्या झाल्यास जमिनीतील ओलाव्याचा रोपांच्या उगवणक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होताना उगवलेली रोपे कमकुवत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामाचे शेतकऱ्‍यांना वेध लागले असून, शेतीच्या मशागतीची अंतिम टप्प्यातील कामे मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यामध्ये करण्याचे नियोजन अनेक शेतकऱ्‍यांनी केले; मात्र, मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने या नियोजनावर पाणी फेरले. शेतीच्या मशागतीच्या अंतिम टप्प्यातील कामांचे नियोजन कोलमडले आहे. उन्हाळी शेती केलेल्या अनेक भागातील शेतमळ्या पावसाच्या पाण्याने भरल्याने मशागतीसह त्या मळ्यांमधील भाजावळीची कामे करायची राहिली आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यामध्ये शेतकऱ्यांकडून कातळ परिसरातील धूळफेक पेरण्या केल्या जातात; मात्र या पावसामुळे त्यालाही ब्रेक लागला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास त्या शेतांमध्ये धूळफेक पेरण्याऐवजी नियमित भाताची लावणी करावी लागणार आहे. पाऊस न थांबल्यास जमिनीतील ओलाव्याचा खरीप हंगामात झालेल्या पेरणीतील रोपांच्या उगवण क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
----
कोट
सध्या पडत असलेल्या पावसाचा जोर कायम राहिल्यास जमिनींमध्ये ओलावा राहणार आहे. तशा स्थितीमध्ये शेतकऱ्‍यांनी पेरणी केल्यास जमिनीतील ओलाव्याचा रोपांच्या उगवणक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. रोपे कमकुवतही होऊ शकतात. पावसाचा जोर कमी होऊन ऊन पडल्यास त्यामध्ये बियाणे पेरल्यास रोपांच्या उगवणक्षमतेवर फारसा परिणाम होणार नाही.
-डॉ. विजय दळवी, संशोधक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
---
कोट
कातळावर पेरणी केली जात असलेल्या शेतीची (धूळफेक पेरणी) नांगरणी आणि बियाणे पेरणी साधारणतः १५ मे नंतर केली जाते; मात्र पावसाने शेतीची नांगरणी आणि पेरणी करण्याची शेतकऱ्‍यांना संधीच दिलेली नाही. पावसाचा असाच जोर अजून चार-पाच दिवस कायम राहिल्यास यावर्षी शेतीची नांगरणी आणि पेरणी करताच येणार नाही. त्याऐवजी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नियमित रोपांची लावणी करावी लागणार आहे.
-मनोहर धुरी, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com