वैभववाडी नायब तहसीलदारपदी दिलीप पाटील

वैभववाडी नायब तहसीलदारपदी दिलीप पाटील
Published on

65886

वैभववाडी नायब
तहसीलदारपदी
दिलीप पाटील
कणकवली ः जिल्ह्यातील महसूल विभागातील मंडल अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. त्यामुळे कणकवलीतील संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या दिलीप पाटील यांना वैभववाडी निवासी नायब तहसीलदारपदी नियुक्ती देण्यात आली. पाटील हे महसूल विभागात ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आचरा विभागात मंडल अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच फोंडाघाट येथे आणि सांगवे मंडल अधिकारी होते. कणकवलीत संजय गांधी निराधार योजनेच्या सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून त्यांना नेमणूक दिली होती. नुकत्याच राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात विविध उपक्रमांत पुढाकार घेतलेल्या श्री.पाटील यांना आता पदोन्नती देण्यात आली आहे. उत्कृष्ट मंडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com