सेवा सुधरा अन्यथा ‘बीएसएनएल’ला टाळे

सेवा सुधरा अन्यथा ‘बीएसएनएल’ला टाळे

Published on

65938

सेवा सुधरा अन्यथा ‘बीएसएनएल’ला टाळे

कळसुलीवासीयांचा इशारा; अभियंत्‍यांना चार दिवसांची डेडलाईन

कणकवली, ता. २४ ः तालुक्यातील कळसुली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे. ही सेवा चार दिवसांत सुरू करा अन्यथा आपल्‍या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये यांच्यासह ग्रामस्थांनी आज दिला.
सरपंच पारधिये, कल्‍पेश सुद्रीक आदींसह कळसुलीवासीयांनी कणकवली बीएसएनएल कार्यालयातील उपमंडल अधिकारी गणेश वाघाटे यांची भेट घेतली. शिवाय त्यांना निवेदनही दिले. श्री.पारधिये म्‍हणाले की, ‘‘कळसुली गावात बीएसएनएल शिवाय कोणत्याही टॉवरचे नेटवर्क येत नाही. गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल, बँक, पोस्टखाते आदी सर्वांना बीएसएनएलच्या नेटवर्कचा आधार आहे. मात्र, ही सेवा ठप्प झाल्‍याचा मोठा फटका ग्रामस्थांना बसत आहे. कळसुलीची लोकसंख्या साडेतीन हजारच्या आसपास असून गावात बीएसएनएलचे दोन टॉवर आहेत. मात्र, ते वारंवार बंद होत आहेत.
कळसुलील दोन्ही बीएसएनएल टॉवर चार दिवसांत सुरू करा. अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा सरपंच श्री.पारधीये यांनी बीएसएनएलच्या उपमंडल अधिकाऱ्यांना दिला. तर टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, अशी मागणी पंच सदस्य कल्पेश सुद्रिक यांनी केली. यावेळी पंच सदस्य नंदकिशोर परब, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चव्हाण, मोहित सावंत, तुळशीदास परब, दत्तात्रय शिर्के, रमेश राणे, बळीराम राणे, प्रभाकर दळवी, सागर शिर्के, अक्षय मुरकर, आर्यन शिर्के आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com