सावंतवाडी-भटवाडी रस्ता धोकादायक
65992
सावंतवाडी-भटवाडी रस्ता धोकादायक
मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी; तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः शहरातील भटवाडी परिसरात प्रस्तावित नळपाणी योजनेसाठी केलेल्या जलवाहिनीच्या खोदकामामुळे रस्त्याकडेला मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याची माती वाहून गेल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी धोकादायक झाडे आणि वीज खांब असल्याने यावर ठेकेदाराने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी दिले आहेत. त्यांनी शुक्रवारी (ता. २३) भटवाडी परिसराची पाहणी केली.
याप्रसंगी माजी नगरसेविका दीपाली भालेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, बबन डिसोजा, बबलू डिसोजा, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव, समिधा नाईक, श्रीमती लाड, प्रसाद राणे, बंड्या केरकर, अनिल आयरे, रवी नाईक, गेगरी डान्टस, श्री. प्रभूदेसाई, श्री. तेंडुलकर आदी उपस्थित होते.
दीड महिन्यापूर्वी नळपाणी योजनेसाठी जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले होते. पाईप टाकल्यानंतर ठेकेदाराने यावर खडीकरण आणि डांबरीकरण करणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने अवकाळी पावसामुळे खोदलेले खड्डे उघडे पडले असून माती रस्त्यावर आल्याने सर्वत्र चिखल पसरला आहे. तसेच, बंड्या केरकर यांच्या दुकानासमोरची धोकादायक झाडे त्वरित हटवण्यासंबंधी मुख्याधिकारी पाटील यांनी झाड मालकांना नोटिसा काढण्याचे निर्देश दिले. रस्त्याकडेला असलेले धोकादायक वीज खांब हटवून रस्ता सुरक्षित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-----
धोकादायक खड्ड्यांकडे वेधले लक्ष
मुख्याधिकारी पाटील यांनी बोरजिस वाडा, नक्षत्र अपार्टमेंट, कुणकेरी रस्ता या भागांची पाहणी केली. तसेच नुकत्याच बांधलेल्या गटाराला भगदाड पडल्यामुळे ते तातडीने दुरुस्तीचे आदेशही त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिले. नागरिकांनी रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या आणि दुरुस्त न केलेल्या जलवाहिनीमुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यांकडे मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावर तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.