स्वच्छतागृह पाडल्याने गैरसोय

स्वच्छतागृह पाडल्याने गैरसोय

Published on

स्वच्छतागृह
पाडल्याने गैरसोय
रत्नागिरी ः शहरातील आठवडा बाजार येथील जुने स्वच्छतागृह पाडून नवीन स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. हे काम अर्धे झाले आहे. जुने स्वच्छतागृह पाडण्यात आल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याच परिसरात ट्रॅव्हल्स बस लागतात. त्यामुळे मुंबई-पुण्याकडे जाणारे असंख्य प्रवासी, चाकरमानी इथे येत असतात; मात्र स्वच्छतागृह नसल्याने या सगळ्या लोकांची गैरसोय होत आहे. रहाटागर बसस्थानकातील स्वच्छतागृहसुद्धा बंद करण्यात आल्यामुळे आठवडा बाजारातील नागरिकांना एसटी स्टँडवर जावे लागत आहे.

चिपळुणात दहा
वाड्यांमध्ये टंचाई
चिपळूण : तालुक्यात पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नदी, नाले प्रवाही झाले आहेत. अशावेळी टॅंकरने पाण्याची खरीच गरज आहे का, याची पडताळणी करा अशी सूचना प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी संबंधितांना केली आहे. गेले तीन दिवस धो-धो कोसळणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाने तालुक्याला झोडपले आहे. त्यामुळे नदीनाल्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात अक्षरशः पाणी साचत आहे. तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. या गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. मागील काही दिवस पावसाने सुरवात केल्यानंतरही टॅंकरची मागणी आली. त्यामुळे खरच या गावांना टॅंकरची गरज आहे का, हे तपासून घेण्याची सूचना प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समितीला केली आहे. तालुक्यातील अडरे, अनारी, टेरव, सावर्डे, कोंडमळा, गुढे, कादवड, खडपोली या गावातील १० वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्याशिवाय काही गावातील डोंगराळ भागात राहणाऱ्या धनगर वस्तीमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. तेथून टॅंकरची मागणी आली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार
मोफत बियाणे
चिपळूण ः आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम २०२५ मध्ये ''नाविन्यपूर्ण बाबी'' या योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भात आणि नाचणीचे सुधारित बियाणे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांसाठी खर्च करावा लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि पिकांची गुणवत्ताही सुधारेल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली. भातासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केलेले ''रत्नागिरी-०८'' हे अधिक उत्पादन देणारे वाण शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे. तसेच नाचणीसाठी ''दापोली-०२'' हे सुधारित वाण मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी चिपळूण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषीसेवक किंवा थेट तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी विद्यार्थ्यांचा
‘युनायटेड’मध्ये मेळावा
चिपळूण ः युनायटेड इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या २००२ च्या दहावीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. ४० ते ४२ विद्यार्थी स्नेहमेळाव्याला उपस्थित होते. शालेय मित्र-मैत्रिणींना भेटून विद्यार्थी आनंदी आणि भावनिक झाले. विद्यार्थ्यांनी वर्ग सजवला होता. मुलींनी रांगोळ्या घातल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात शाळेप्रमाणे राष्ट्रागीतांनी झाली. शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कानडे यांनी एका स्वरचित कवितेचे वाचन केले. विद्यार्थ्यांनी शाळेला शास्त्र विषयासाठी उपयोगी पडेल, असा ओव्हन भेट दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com